शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन रुपयाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 10:14 IST

शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देती त्याला भैय्या म्हणत होतीनागरिकांनी दिला बेदम चोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारच्या १० वर्षीय बालिकेला दोन रुपयांचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा (मसाळा) झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली. शनिवारी दुपारी ही घटना उजेडात आल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पीडित बालिका चवथीत शिकते. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. आरोपी मोंटू उर्फ शमिम शेख लतिफ (वय ३०) हा त्याच वस्तीत राहतो आणि माती-गोट्याचे काम करतो. बालिका त्याला भैय्या म्हणते. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास पीडित बालिका तिच्या घरासमोर खेळत होती. आरोपी मोंटूने तिला दोन रुपये देतो, असे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. तेथे त्याने तिचे कपडे उतरवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारी पीडित मुलीची आई तिची आंघोळ घालून देत असताना तिच्या गळ्याखाली नखाचे ओरबडे दिसले. त्यामुळे आईने तिला विचारले असता तिने भैय्याने शुक्रवारी दुपारी दोन रुपये देतो, असे म्हणून घरात नेले आणि अत्याचार केल्याची माहिती दिली. त्याच्याच नखाचे हे ओरबडे आहेत, असेही सांगितले. हा संतापजनक प्रकार ऐकून आई हादरली. तिने पती घरी येईपर्यंत चुप्पी साधली. सायंकाळी पीडित मुलीचे वडील घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. नंतर तो शेजाºयांना माहीत झाला. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या वडिलांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक मिश्रा यांनी गुन्हा दाखल करून बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीला नागरिकांनी झोडपलेदरम्यान आरोपीचे कृत्य माहीत होताच परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला. लोक फरार आरोपीला शोधू लागले. तो लोकांच्या हाती लागला. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलेच झोडपले. वेळीच पोलीस आले अन्यथा लोकांच्या मारहाणीत आरोपीचा जीवही जाऊ शकला असता इतके लोक संतापले होते. या घटनेमुळे चिमुकली दहशतीत आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. तर नागरिकांनी दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार