शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: September 21, 2015 02:50 IST

१६ वर्षीय मैत्रिणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका निर्माणाधीन ठिकाणी नेऊन आरोपी मित्राने तिच्यासोबत तब्बल सात दिवस शरीरसंबंध प्रस्थापित केले.

सात दिवस डांबून ठेवले : एमआयडीसीतील प्रकार नागपूर : १६ वर्षीय मैत्रिणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका निर्माणाधीन ठिकाणी नेऊन आरोपी मित्राने तिच्यासोबत तब्बल सात दिवस शरीरसंबंध प्रस्थापित केले. सुमित पुरी (वय १९) असे आरोपीचे नाव असून, तो बुटीबोरीच्या गोदावरी लेआऊटमध्ये राहतो. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ती याचवर्षी दहावी नापास झाली. आरोपी सुमित पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. त्याचे वडील लेबर कॉन्टॅ्रक्टर असून, मुलीचा परिवार एमआयडीसीत राहतो. पूर्वी ती सुद्धा बुटीबोरीतच राहत होती. शेजारी असल्यामुळे या दोघांमध्ये ‘मैत्रीसंबंध’ निर्माण झाले. त्यानंतर मुलीचा परिवार बुटीबोरी सोडून एमआयडीसीत राहायला आल्याने या दोघांची ताटातूट झाली. दरम्यान, १० सप्टेंबरला रात्री १०.३० वाजता मुलगी आपल्या घरासमोर उभी होती. तेवढ्यात सुमित तेथे आला. तक्रारीनुसार जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवून आणि बुटीबोरीतील एका निर्माणाधीनस्थळी आला. या ठिकाणी एका खोलीत डांबून आरोपीने तिच्यासोबत तब्बल सात दिवस वारंवार शरीरसंबंध जोडले. दरम्यान, मुलीच्या मैत्रिणींच्या माध्यमातून शोध घेणाऱ्या आईला गुरुवारी मुलगी गवसली. तिची चौकशी केली असता, ‘सुमितने बुटीबोरीतील एका घराच्या खोलीत डांबून ठेवून जबरी बलात्कार केला’,अशी माहिती तिने दिली. ती ऐकून आईने तिला सरळ बुटीबोरी ठाण्यात नेले. घटनाक्रमाची सुरुवात एमआयडीसीतून झाल्याचे ऐकताच बुटीबोरी पोलिसांनी या मायलेकींना एमआयडीसीत पाठविले. एमआयडीसीचे ठाणेदार विष्णुकांत भोये यांनी घटनाक्रम ऐकून अपहरण करून बलात्कार करणे, डांबून ठेवणे, आदी गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)सारेच धक्कादायकया प्रकरणाचे अनेक धक्कादायक पैलू पोलीस चौकशीत उघड झाले आहे. पीडित मुलगी आणि आरोपींमध्ये वर्षभरापासून मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे फिरण्याच्या नावाखाली अनेकदा बाहेर जायचे. दोन-तीन दिवस बाहेर राहायचे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी ते बाहेर गेले. कुठेच जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी ‘भलत्याच ठिकाणी’ रात्र काढल्याचेही तपासात पुढे आल्याचे पोलीस सांगतात. मुलगी नेहमीच मैत्रिणीकडे जात असल्यामुळे याहीवेळी ती मैत्रिणीकडेच असावी, असे समजून कुटुंबीयांनी फारसे मनावर घेतले नाही. मात्र तब्बल सात दिवस होऊनही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने चिंताग्रस्त आईने तिची शोधाशोध सुरू केली अन् हे प्रकरण उजेडात आले.