शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्याच प्रियकराने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मैत्रिणीच्या प्रियकरानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. अजनी पोलिसांनी घटनेच्या सूत्रधारासह चार आरोपींना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मैत्रिणीच्या प्रियकरानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. अजनी पोलिसांनी घटनेच्या सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे. यात अमित लोखंडे (३२, रा. कैलाशनगर), प्रशित गोटे (२५), विशाल ऊर्फ दत्तू दाभणे व बिट्टू वाघमारेचा सहभाग आहे.

पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या मैत्रिणीची अमित लोखंडेसोबत मैत्री आहे. अमित व अन्य तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पीडित विद्यार्थिनीही अमितला ओळखत होती. ती मंगळवारी दुपारी ४.३० वाजता आपल्या मैत्रिणीसह अमित लोखंडे याला भेटायला गेली होती. दरम्यान, अमितने विद्यार्थिनीला दत्तूच्या घराजवळील फ्लॅटमध्ये नेले. तेथे बेडरूममध्ये चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला प्रशिक गोटे यांनी चाकूचा धाक दाखवत शांत राहण्यास बाध्य केले. फ्लॅटच्या बाहेर दत्तू दाभणे व कौैस्तुभ वाघमारे उभे होते. पीडितेने आपल्या कुटुंबीयांसोबत अजनी ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी बलात्कार, धमकावणे व शस्त्र निरोधक कायद्याअंतर्गत प्रकरणाची नोंद करून आरोपींना अटक केली आहे.

दत्तू दाभणेच्या विरोधात यापूर्वीही बलात्कार, मद्य तस्करीसह अनेक प्रकरणांची नोंद आहे. परिसरात त्याचा धाक आहे. ज्या फ्लॅटमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार केला, त्यावर दत्तूचाच कब्जा आहे. फ्लॅट मालकाचा शोध घेऊन विचारपूस केली जाण्याची शक्यता आहे. घटनास्थळ हे दाट वस्तीचे आहे. दुपारच्या वेळी लोक घरी असतात. घटनेच्या वेळी विद्यार्थिनीने किंवा तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केला असता तर तेव्हाच हे प्रकरण उघडकीस आले असते. आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे, ही बाब विद्यार्थिनी व मैत्रिणीला माहीत असतानाही त्यांनी भेटायला जाणे कोड्यात पाडणारे आहे.

............