शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर दोघांचा बलात्कार

By admin | Updated: October 9, 2015 02:49 IST

दोघांनी एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. तर आरोपींच्या दोन साथीदारांनी पीडित युवतीला या प्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,....

आरोपीच्या साथीदारांची धमकी : चौघांविरुद्ध गुन्हे दाखलनागपूर : दोघांनी एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. तर आरोपींच्या दोन साथीदारांनी पीडित युवतीला या प्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली. अमित सागर ओझा (वय २२, रा. पलोटीनगर, मानकापूर) आणि बिरजू (वय २५, रा. इंदोरा) अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. गिट्टीखदानमधील युवती (वय १८) आरोपी अमितची मैत्रीण आहे. ३० सप्टेंबरला सायंकाळी अमितने तिला फिरण्याच्या निमित्ताने बाहेर नेले. उशिरा रात्रीपर्यंत इकडे तिकडे फिरवल्यानंतर मध्यरात्री अमितने तिला इंदोऱ्यातील बिरजूच्या रूमवर नेले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ते पाहून आरोपी बिरजूनेही शरीरसंबंधाची मागणी केली. युवतीने नकार देताच त्याने तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १ आॅक्टोबरला पहाटे २ वाजता आरोपी अमितने पुन्हा तिला आपल्या रूममवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुस-या दिवशीसुद्धा आरोपीने असाच प्रकार केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडित युवतीने आरोपीसोबत मित्रता तोडली. त्यामुळे ती पोलिसांकडे तक्रार करू शकते, अशी भीती आरोपींना वाटली. तिने पोलिसांकडे जाऊ नये म्हणून आरोपीची साथीदार सुप्रिया ऊर्फ नेहा (वय २३) आणि प्रिन्स यादव (वय २५) या दोघांनी तिला या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. धोका लक्षात घेऊन पीडित युवतीने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय आर.डी. बावनकर यांनी सामूहिक बलात्कार तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)नंदनवनमध्येही बलात्कारनंदनवनमध्येही बलात्काराची घटना उघडकीस आली. आरोपी गजानन ताजने (वय ३२) याने घरासमोर राहणाऱ्या १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून मंगळवारी रात्री ७.१५ च्या सुमारास आपल्या रुममध्ये नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी ताजनेविरुद्ध गुन्हा दाखल केला.