शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

लग्न मोडण्याची भीती दाखवून बलात्कार, आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: August 30, 2015 02:49 IST

लग्न मोडण्याची भीती दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका आरोपीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

नागपूर : विवाह ठरला, पत्रिका वाटल्या. पण, संसारिक जीवनाचे स्वप्न रंगवणाऱ्या एका भावी वधूला चक्क लग्न मोडण्याची भीती दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका आरोपीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. योगेश दामोदरराव देवहरे, असे आरोपीचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. आरोपी योगेश हा कोतवाली भागात राहणाऱ्या आपल्या ओळखीच्या महिलेच्या घरी हा घृणित प्रकार करीत होता. प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलीच्या लग्नाची योगेशसोबत २१ डिसेंबर २०१४ रोजी अंतिम बोलणी होऊन २९ जानेवारी २०१५ रोजी साक्षगंध झाले होते. १५ मे २०१५ ही लग्नतिथी काढून पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. साक्षगंधानंतर योगेश हा तिच्याशी सतत मोबाईलवर संपर्क करायचा. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी आरोपी हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करून त्याने या मुलीला आपल्या ओळखीच्या महिलेच्या घरी नेले होते. या ठिकाणी त्याने लग्न मोडण्याची भीती दाखवून पीडित मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तो नेहमीच रविवारच्या दिवशी येऊन पीडित मुलीला याच महिलेच्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करायचा. लग्नात एलसीडी, महाराजा सोफा आणि पाच लाख रुपये रोख रकमेची मागणीही तो करू लागला होता. आपण हुंडा देण्यास असमर्थ असल्याचे पीडित मुलीच्या आई-वडिलाने त्याला बजावले होते. पुढे तो या मुलीचे चारित्र्य बरोबर नाही, असे आरोप करून तिची बदनामी करू लागला होता. प्रियकराचे नाव सांगण्यासाठी तो तिच्यावर सतत दबाव आणून आत्महत्या करण्याची धमकीही देऊ लागला होता. पीडित मुलीने धाडस करून घडलेली संपूर्ण कर्मकहाणी आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात योगेशविरुद्ध तक्रार नोंदवताच पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (एन) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. प्रकरण गंभीर असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)