शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पाटील यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:08 IST

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, यासंदर्भातील याचिका तांत्रिक मुद्यांच्या आधारावर उच्च न्यायालयात दाखल केल्या जाऊ शकत नसल्याचा दावा करून याचिका खारीज करण्याची विनंती केली.

ठळक मुद्देनिवडणुकीला आव्हान : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, यासंदर्भातील याचिका तांत्रिक मुद्यांच्या आधारावर उच्च न्यायालयात दाखल केल्या जाऊ शकत नसल्याचा दावा करून याचिका खारीज करण्याची विनंती केली.प्रशांत काटे व संतोष गावंडे या दोघांनी पाटील यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने पाटील यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले व पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर चार आठवड्यांनंतर सुनावणी निश्चित केली. पाटील विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. ही निवडणूक ३ फेबु्रवारी २०१७ रोजी झाली व ६ फेबु्रवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाटील यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. त्यामुळे विविध कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. याचिकाकर्त्यांचे आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे तर, पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक