शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिणी लढली...

By admin | Updated: October 4, 2015 03:12 IST

दिवसाढवळ्या दोन लुटारू एका महिलेच्या घरात शिरतात. घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचे हात पकडून, तोंड दाबून बेदम मारहाण करतात. नंतर तिच्या सदनिकेत आदळआपट करतात.

लुटारूंना बदडून पळविले : मनीषनगरातील घटना नरेश डोंगरे नागपूरदिवसाढवळ्या दोन लुटारू एका महिलेच्या घरात शिरतात. घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचे हात पकडून, तोंड दाबून बेदम मारहाण करतात. नंतर तिच्या सदनिकेत आदळआपट करतात. अपेक्षेनुसार काहीच मिळाले नसल्याने चिडलेले लुटारू पुन्हा येऊन तिच्याजवळचे ४ हजार आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतात. रोख आणि मौल्यवान चिजवस्तूंसाठी तिला पुन्हा मारहाण करतात. दरम्यान, त्यांच्या विकृतीची कल्पना येताच तिच्यातील चंडिका जागी होते. बाजूचा लाकडी दांडा उचलून ती दोघांवर तुटून पडते. त्यांना बदड बदड बदडते. परिणामी लुटारू आरडाओरड करीत पळून जातात. हा कुठल्या चित्रपट अथवा टीव्ही मालिकेतील प्रसंग नव्हे तर ही ‘रिअल स्टोरी’ आहे शनिवारी दुपारी मनीषनगरात घडलेली. या प्रसंगातील नायिका अन् तमाम महिला- तरुणींसाठी आदर्श ठरावी, अशा या रणरागिणीचे नाव आहे प्रतीक्षा रचित सिंग ! उच्चविद्याविभूषित प्रतीक्षा केवळ २८ वर्षांची असून ती मूळची भंडारा येथील रहिवासी आहे. तिचे पती प्राध्यापक आहेत. सिंग दाम्पत्य मनीषनगरातील स्वप्नविला अपार्टमेंटमध्ये राहते. या ठिकाणी आणखी दोन परिवार राहतात. दुपारची वेळ, त्यामुळे तिन्ही परिवारांच्या सदनिकांची दारं आतून बंद होती. दुपारी १ च्या सुमारास प्रतीक्षा बँकेत जाण्याच्या तयारीत असताना तिच्या दाराची बेल वाजली. छिद्रातून बघितले तेव्हा बाहेर कुरियर बॉय उभा दिसला. दार उघडताच तिला धक्का देत दोन तरुण आतमध्ये आले. प्रतीक्षाने आरडाओरड करू नये म्हणून एकाने तिचे हात पकडले तर दुस-याने तोंड दाबले. अशाही स्थितीत तिने प्रतिकार करताच दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिचा सत्कारच व्हावा !बीएससी, एमबीए अशी उच्चशिक्षित असलेली प्रतीक्षा यापूर्वी ‘प्रिंट मीडिया‘त सेवारत होती. सध्या ती गृहिणी म्हणून घर-परिवाराची जबाबदारी सांभाळते. तिने ज्या पध्दतीने लुटारूंचा सामना करून त्यांना पिटाळून लावले, ते पाहता तिचा ‘रणरागिणी‘ म्हणून जाहीर सत्कार व्हावा, अशी प्रतिक्रिया मनीषनगरातून उमटली आहे.