शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकची पाणीपुरवठा योजना वांध्यात

By admin | Updated: August 28, 2014 02:04 IST

निधीअभावी रामटेक नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना वांध्यात आली असून, राज्य शासनाने मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर उच्च

नागपूर : निधीअभावी रामटेक नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना वांध्यात आली असून, राज्य शासनाने मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्या. वासंती नाईक आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने नगरविकास विभागाच्या सचिवांसह अन्य प्रतिवादींना २२ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविणारी नोटीस जारी केली आहे. अन्य प्रतिवादींमध्ये पाणीपुरवठा योजनेचे सचिव, नागपूर विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा समावेश आहे. ही याचिका रामटेक नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष माधुरी उईके, उपाध्यक्ष रमेश कारेमोरे, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी अ‍ॅड. महेश धात्रक यांच्यामार्फत दाखल केली आहे. याचिकेनुसार महाराष्ट्र शासनाने राज्य सुवर्ण जयंती, सुजल व निर्मल अभियानांतर्गत प्रत्येक नगर परिषदांमध्ये पाणीपुरवठा व मलनिस्सारण कार्यक्रमासाठी विशेष अनुदान देण्याचे ठरवले होते. त्यानुसार या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यात रामटेक नगर परिषदेचाही समावेश होता. त्यानुसार रामटेकची पाणीपुरवठा योजना ९० टक्के अनुदानासह ६ कोटी २२ लाख ८० हजार निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी ४ कोटी रुपये नगरविकास विभागाने, २ कोटी २२ लाख ८० हजार पाणीपुरवठा विभागाने आणि उर्वरित १० टक्के निधी ६९ लाख २० हजार रुपये रामटेक न.प.ने देण्याचे ठरवण्यात आले होते. ही योजना राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे नगरविकास विभागाने ३ मे २०१२ रोजी ४ कोटींपैकी १ कोटी ५२ लाख रुपये दिले. पाणीपुरवठा विभागाने २ कोटी २२ लाखांपैकी १ कोटी ९० लाख रुपये दिले. रामटेक न.प.नेही ६३ लाख ३९ हजार रुपये दिले. मुख्याधिकाऱ्याने उर्वरित निधीसाठी तीनवेळा विनंतीपत्र पाठवूनही नगरविकास विभागाने उर्वरित निधी दिला नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे काम रखडले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही निधीअभावी ज्या स्थितीत काम झाले त्याच स्थितीत ते नगर परिषदेला हस्तांतरित करण्याचे ११ मार्च २०१४ रोजी पत्र देऊन सूचित केले. रामटेक न.प.ला उर्वरित निधी न देता याउलट नगरविकास विभागाने ८ मे २०१४ रोजी मोवाडला ६३ लाख, कामठीला ७५ लाख, खाप्याला ५० लाख, मौदा, काटोल आणि सावनेरला प्रत्येकी ५० लाख रुपये दिले. २० मे २०१४ रोजी उमरेड नगर परिषदेला ५ कोटी ९२ लाखांचा विशेष निधी दिला. याचिकेत असा आरोप करण्यात आला की, रामटेक नगर परिषदेत शिवसेना सत्तेत निधी वाटपात अन्याय करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपला पक्ष सत्तेत असलेल्या नगर परिषदांनाच अनुदान दिले. याचिकेत असेही नमूद करण्यात आले की, निधीअभावी आमची पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नगरविकास विभागाला २ कोटी ४८ लाख आणि पाणीपुरवठा विभागाला २४ लाख रुपये जारी करण्याबाबतचे निर्देश देण्यात यावे, अशी प्रार्थनाही याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आली. न्यायालयात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. महेश धात्रक यांनी काम पाहिले. प्रतिवादींतर्फे सहायक सरकारी वकील मयुरी देशमुख यांनी नोटिसा स्वीकारल्या. (प्रतिनिधी)