शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:19 IST

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली ‘सोशल मीडिया’वर याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी एक लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात विदर्भातील सर्व आमदारांची बैठक १७ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे.

ठळक मुद्दे२५ तारखेच्या सभेची तयारी जोरात : संघाने भाजपाला दिले ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली ‘सोशल मीडिया’वर याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपालादेखील विशेष ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या सभेला कमीत कमी एक लाख लोक यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात विदर्भातील सर्व आमदारांची बैठक १७ नोव्हेंबर रोजी रेशीमबाग स्थित हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात होणार आहे.राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरु व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सुमारे ३०० प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात हुंकार सभेबाबत माहिती देण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे.यासंदर्भात सर्व संघटना आपापल्या पातळीवर कामाला लागल्या आहेत. संघभूमीत होणाऱ्या सभेसाठी नागपूरसह सहा लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते येणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. यासंदर्भात संयोजन समितीदेखील तयार करण्यात आली आहे. दररोज विविध पातळ्यांवर बैठका सुरू आहेत व तयारीचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘सोशल मीडिया’वर वातावरणनिर्मितीदरम्यान, हुंकार सभेबाबत संघ परिवारातील विविध संघटनांतून ‘सोशल मीडिया’वर वातावरणनिर्मिती सुरू आहे. शहर व प्रांतातील विविध कार्यकर्त्यांपर्यंत या माध्यमातून माहिती पोहोचविण्यात येत आहे. सोबतच जनमानसातदेखील याबाबत ‘पोस्ट’ पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.१७ तारखेपासून ‘जागरण सत्र’दरम्यान, जनसामान्यांमध्ये हुंकार सभेबाबत जागृती व्हावी यासाठी विहिंप व विविध संघटनांतर्फे १७ नोव्हेंबरपासून जागरण सत्र राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील विविध मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात येईल. सोबतच भाजयुमोतर्फे राजाबाक्षा मंदिरात सायंकाळी ६ वाजता तर विहिंपतर्फे पोद्दारेश्वर राममंदिरात त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता महाआरती करण्यात येईल. तसेच पत्रकांचेदेखील वाटप होईल.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAyodhyaअयोध्या