डांबरीकरणाची गती वाढवा : मनपा आयुक्तांचे निर्देशनागपूर : नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रेल्वे स्टेशनजवळील रामझुला पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.या पुलाचे सर्व ५४ केबल लावण्यात आले आहेत. जयस्तंभ चौकाकडून जाणाऱ्या पुलाचे अॅप्रोचचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजुकडील मास्टीक डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाला गती द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले.आयुक्त वर्धने यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह रामझुल्याच्या कामाची पाहणी केली. मेयो हॉस्पिटल व जयस्तंभ चौकाकडून दोन्ही बाजूकडील अॅप्रोचचे काम पूर्ण झाले आहे. केबल्सवर पेंटिंगचे काम सुरू आहे. स्ट्रीट लाईटसाठी २२ पोल लावण्यात आले आहेत. डांबरीकरणानंतर थर्मो प्लास्टिकचे पट्टे साईन अॅण्ड कॉशन बोर्ड लावण्यात आले आहेत. मस्कासाथ पूल तोडणे सुरू इतवारी मस्कासाथ येथून शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनकडे जाणारा जुना आरओबी (रेल्वे उड्डाण पूल) तोडून नव्या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जुना पूल कटर मशीनने तोडण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे शांतीनगरकडून राऊत चौकाकडे जाणाऱ्या अंडरपास अॅप्रोच भुयारी मार्गाचे कामसुद्धा पूर्ण झालेले आहे. या कामाचीही वर्धने यांनी पाहणी केली. जयस्तंभ चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवाजयस्तंभ चौकात तीन दिशेने येणारी वाहने एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचा वाहतूक विभाग व वाहतूक पोलिसांनी नियोजन करावे, डिवायडरचे काम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश वर्धने यांनी दिले. (प्रतिनिधी)
रामझुल्याचे ५४ केबल पूर्ण
By admin | Updated: November 25, 2014 00:55 IST