शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘रामझुला-२’ नवीन वर्षात नागपूरकरांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 10:29 IST

येत्या नवीन वर्षात रामझुला पार्ट दोन नागपूरकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.

ठळक मुद्देदीड महिन्यात काम पूर्णअंतिम टप्प्यातील कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोद्दारेश्वर राम मंदिर ते जयस्तंभ चौक दरम्यान रेल्वे स्टेशनच्या रुळावर बनत असलेला केबल आधारित रेल्वे ओव्हरब्रिज ‘रामझुला’च्या पहिल्या भागाचे काम पूर्ण व्हायला आठ वर्षे लागली. परंतु याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम मात्र आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. केवळ स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शन आदी कामे शिल्लक आहेत. ही कामे दीड ते दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात रामझुला पार्ट दोन नागपूरकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केंद्र आणि राज्य सरकार तसेच मनपाच्या आर्थिक सहकार्याने केबल आधारित रामझुला प्रोजेक्ट साकारण्यात येत आहे. या कामाचे कंत्राट एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. रामझुला प्रोजेक्टचे वर्कआॅर्डर २५ जानेवारी २००६ रोजी देण्यात आले होते. हे काम दोन वर्षात पूर्ण करावयाचे हेते. परंतु तसे झाले नाही.

अगोदर लागले आठ वर्ष, आता चार वर्षात कामरामझुला भाग १ चे काम पूर्ण व्हायला तब्बल आठ वर्षे लागली. याचे अनेक कारणेही होती. कधी रेल्वेने रामझुल्याच्या डिझाईनवरून बाधा निर्माण केली तर कधी ठेकेदार कंपनीतर्फे खर्च वाढवण्याची मागणी करीत काम रोखण्यात आले. या सर्वांमध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ७ डिसेंबर २०१४ ला शक्य होऊ शकले. परंतु दुसऱ्या टप्प्याचे काम मात्र रेकॉर्ड ४ वर्षात होतांना दिसून येत आहे. यातही जुना पूल तोडण्यातच सहा महिन्याचा कालावधी लागला.

स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शनचे काम शिल्लकमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारिक सूत्रानुसार रामझुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. केवळ स्ट्रीट लाईट, जाळी, केबल प्रोटेक्शन लावण्याचे काम शिल्लक आहे. रामझुल्याच्या फूटपाथच्या देन्ही बाजूला जाळी लावण्यात येत आहे. पाईप, ड्रेनेज सिस्टीमही लावायची आहे. ही सर्व कामे दीड ते दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.जपानवरून आलेत केबलरामझुलासाठी विशेष प्रकारचे मोम मिश्रित केबल पूर्वी दक्षिण आफ्रिकेतून मागवण्यात आले होते. यासाठी केबलची फटिक टेस्टही करण्यात आली होती. परंतु पुढे संबंधित कंपनीत आग लागल्याने कंपनी वेळेत केबलचे आॅर्डर पूर्ण करण्याच्या स्थितीत नव्हती. अशा वेळी जपानवरून केबल मागवण्यात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका