शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पार्किंगने केली रामदासपेठेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

प्रवीण खापरे/लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील प्रत्येक बाजारपेठ, मुख्य भाग अवैध पार्किंगमुळे त्रस्त आहे. एकीकडे दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात ...

प्रवीण खापरे/लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील प्रत्येक बाजारपेठ, मुख्य भाग अवैध पार्किंगमुळे त्रस्त आहे. एकीकडे दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केल्यामुळे दुकानदारांची डोकेदुखी वाढते. तर दुसरीकडे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागपूरकरांना आपले वाहन पार्क कुठे करायचे, हा प्रश्न पडतो. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेला अवैध पार्किंगने विळखा घातल्याचे चित्र आहे. वाहतूक विभाग अवैध पार्किंगवर दंड वसुलीसाठी कारवाई करतो. महापालिकाही थातूरमातूर कारवाई करते. मात्र, ठोस उपाय योजले जात नाहीत. परिणामी, पार्किंगची कोंडी सुटता सुटेनाशी झाली आहे.

रामदासपेठ ही शहरातील अतिव्यस्त असणाऱ्या भागापैकी एक अशी वस्ती. गर्भश्रीमंतांचे आलिशान निवारे, याच भागात आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची अर्थात हॉस्पिटल्स, हॉटेल्स, चहा-पान-खानावळींची ही हक्काची पेठ हाेय. रात्रंदिवस अतिव्यस्त असणाऱ्या या परिसराला आणखी गजबज करण्याचे काम वाटसरूंची वाहने करतात. ही वाहने कुठेही, कशीही पार्क केली जातात आणि त्याचा फटका रस्त्याने वाहतूक करणाऱ्या अगर पायी चालणाऱ्या नागरिकांना होतो. झाशी राणी चौकापासून ते सेंट्रल मॉल ते दीक्षाभूमी चौक ते लोकमत चौक, ही संपूर्ण रामदासपेठेची चौकट जणू पार्किंगचा अड्डाच बनली आहे. एवढेच नव्हे तर पंचशील चौकापासून सेंट्रल मॉलपर्यंतचा संपूर्ण कॅनल रोडही चारचाकींच्या पार्किंगने भरलेला असतो. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. याबाबत कुणाची काही तक्रार आहे का असे विचारले असता, कुणीच बोलण्यास तयार नव्हते. त्याचे कारण म्हणजे वाहन पार्क करणारे हे सगळे ग्राहक होते.

लोकमत चौक ते पंचशील चौक

लोकमत चौकापासून ते पंचशील चौकापर्यंतचा हा वर्धा महामार्ग रुंदीने साधारणत: १२० फुटाचा आहे. यातील एक ६० फुटाचा धरू या. त्यात पादचारी अर्थात फूटपाथ ४ ते ५ फुटाचे. फूटपाथ असूनही अदृश्य आहे आणि फूटपाथला लागूनच या रस्त्यावर असलेल्या प्रतिष्ठानात येणाऱ्या ग्राहकांची चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. एका सर्वसाधारण कारची लांबी साधारणत: ८ ते १० फूट आणि रुंदी ३ ते ४ फूट. या चारचाकी कशाही तऱ्हेने पार्क केल्या जातात. त्यामुळे, ६० फुटाच्या रस्त्याचा एक भाग ३५ ते ४० फुटापर्यंत निमुळता झालेला असतो.

लोकमत चौक ते दीक्षाभूमी चौक

या रस्त्यावर मोठमोठ्या इमारतींमध्ये विविध हॉस्पिटल्स आहेत. एका अर्थाने शहरातील हा भाग हॉस्पिटल हब म्हणूनही ओळखला जातो. हा रस्ता साधारणत: ८० ते १०० फुटाचा आहे. रस्त्याचा एक भाग ४० ते ५० फुटाचा आणि त्यात ५ ते ६ फूट फूटपाथ आहेत. मात्र, २० फूट रस्ता जरी मोकळा मिळेल तरी धन्यता मानावी, अशी स्थिती आहे. संपूर्ण रस्ता वाटसरू अगर हॉस्पिटल्स, खानावळी, बँका आदींच्या ग्राहकांच्या वाहन पार्किंगने भरलेला असतो.