शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

रामचित्रायण; चैतन्यची अशीही रामभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:29 IST

बालपणीच्या उत्तम संस्कारापायी कोणी उत्तम गायक बनतो, कुणी शिक्षणात तरबेच ठरतो, कुणी समाजसेवक बनतो तर कुणी वैज्ञानिक बनतो. बजाजनगरात राहणारा चैतन्य हा रामभक्त आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली जात असलेल्या या काळात गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान त्याने दररोज रामाचे स्केचेस तयार केले आहेत.

ठळक मुद्देनऊ दिवसात रेखाटले रामचरित्राचे प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चांगले नी वाईट ही जाणिव माणसाला प्रगल्भ बनवित जाते. या जाणिवेचे उन्नयन बालपणातील संस्कारातूनच होत असते. पौराणिक इतिहासातील हिरण्यकश्यपू हा तसा राक्षसवृत्तीचा आणि स्वत:ला जगज्जेता म्हणवून घेण्याच्या दुष्प्रवृत्तीपायी तो तपश्चर्या करतो. त्याचवेळी गर्भवती असलेली त्याची पत्नी कयाधू नारदाच्या आश्रमात भगवतभक्तीमध्ये लिन झालेली असते. गर्भावस्थेतील सत्सचरित्राचा प्रभाव म्हणून कयाधू व हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णूभक्त होतो. एकीकडे बाप दुराचारी आणि दुसरीकडे पुत्र सदाचारी होतो. बालपणीच्या उत्तम संस्कारापायी असे अनेक प्रल्हाद बघायला मिळतात. कोणी उत्तम गायक बनतो, कुणी शिक्षणात तरबेच ठरतो, कुणी समाजसेवक बनतो तर कुणी वैज्ञानिक बनतो. बजाजनगरात राहणारा चैतन्य हा रामभक्त आहे. कोरोनाच्या दुष्प्रभावाखाली जात असलेल्या या काळात गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान त्याने दररोज रामाचे स्केचेस तयार केले आहेत. ते अतिशय देखणे आहेत.१२वीला असलेला चैतन्य माटेगावकर बजाजनगरात राहतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा, ट्युशन क्लासेस सर्वच बंद आहेत. स्वत:ला सगळ्यांनीच घरात दडवून ठेवले आहे. त्यात घरातून मिळालेला गायनाचा वारसा जपत अभ्यास करणे आणि पुस्तकांचे वाचन करणे हा त्याचा नित्यक्रम. घरातच गायक, अभिनेता, लेखक मंडळी आहेत. आई, वडील, काका, काकू, बहिण सगळेच कलेच्या प्रांतात उच्चस्थान ठेवतात. सोबतच रामभक्तीचे वातावरणही या सगळ्या कलावंतांना पोषकत्त्व प्रदान करते. याच काळात रामनवरात्राच्या नऊ दिवसात त्याच्या मनात वेगळीच कल्पना शिरली. नऊ दिवसात पुजापाती, अभ्यासोबतच रामचरित्राचे स्केचेस काढण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला आणि गुढीपाडव्यापासून त्याने सुरुवात केली. वाढत्या दिवसानंतर चित्रांची एका दिवसाची संख्याही वाढवत जावी. जसे पहिल्या दिवसी एक, दुसऱ्या दिवशी दोन, तिसºया दिवशी तिन.... नवव्या दिवशी नऊ चित्र काढायचे आणि रामचित्रायणाची मालिका स्वत:च्या कल्पनेनुसार साकारायचे कलात्मक कार्य चैतन्यने केले. असे चाळीसच्या वर चित्रमालिका त्याने या नऊ दिवसात साकारल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने हे चित्र दुसरे चित्र बघून नव्हे तर मनाला भावेल तसे काढली आहेत. त्यातही पेन्सीलचा वापर त्याने टाळला आहे. मार्करने ठरावित वेळेत तसे चित्र साकारायचे. कुठलीही खोडतोड नाही ती मिटवायचे कारण नाही. सलग चित्रमालिका साकारण्याचा उपक्रम नऊ दिवस चालला आहे. यासोबतच चित्र काढून झाले की रामाचे पुजन, रामरक्षा, विष्णूसहस्त्रनाम पठणाची दिनचर्या त्याच्याकडून नित्यनेमाने होत होती.रामायणावरील रामचित्रमालिका साकारणार! - चैतन्य माटेगावकर: ही चित्रमालिका साकारली ती केवळ रामावरील श्रद्धेपोटी. असे कार्य होईल, याचा विचारही नव्हता. पुढे रामायणावरील चित्रमालिका साकारण्याची तयारी करणार आहे. मी सध्या बारावीला आहे. त्यानंतर डिझायनिंगमध्येच करिअर करायचे असल्याचे चैतन्य माटेगावकरने सांगितले............

टॅग्स :Ram Navamiराम नवमी