शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरसाठी मोदी सरकारवर दबाव आणणार

By admin | Updated: December 27, 2016 02:59 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला

विहिंप आक्रमक : नागपुरात अधिवेशनाला सुरुवात नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन दोन वर्षे झालेली असली तरी अयोध्येतील राम मंदिराच्या विषयाला या सरकारने बासनात गुंडाळले असल्याचे हिदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा विषय पुन्हा तापवून मोदी सरकारवर दबाव आणण्याची रणनीती विश्व हिंदू परिषदेने आखली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नागपुरात आजपासून सुरू झालेल्या विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रन्यासी मंडळाच्या संयुक्त आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. हे अधिवेशन एक आठवडा चालणार असून, पहिल्या टप्प्यातील बैठकीला कापसी येथील माँ उमिया धाम परिसरात सुरुवात झाली आहे. उद्घाटन सत्राला विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. विहिंपची ही अंतर्गत बैठक असल्याने यापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते.भाजप गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी अयोध्येत राम मंंदिर उभारण्याचे आश्वासन देत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु राम मंदिर उभारण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली सुरू नाही. राम मंदिराच्या मुद्याला बगल दिल्याने देशभरातील साधू-संत भाजप सरकारवर नाराज आहेत. यावर अधिवेशनात चर्चा घडवून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप व्यूहरचना आखणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान खुले अधिवेशन होणार आहे. यात ३५ देशांतील ४४ प्रांतातील ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापूर्वीचे अधिवेशन हरिद्वार, काशी, मथुरा व दिल्ली आदी ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नागपुरात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य अधिवेशन होत आहे. विहिंपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अन्य काही राज्यांत गोवंश संरक्षण कायदा करण्यात आला आहे. परंतु कत्तलखान्यात जाणारे गोवंश पकडल्यानतंर त्यांचे पुनर्वसन कोठे आणि कसे करावे, याचा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोवंशाचे पालन करण्याची क्षमता देशभरातील गोशाळांत नाही. त्यामुळे गोवंशाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर मंथन रेशीमबाग येथे पार पडलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत विहिंप नेतेसुद्धा गंभीर आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अधिवेशनात मंथन होणार आहे. तसेच संघटनात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.