शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते राम जेठमलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:50 IST

दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती.

ठळक मुद्देजुनी आठवण : हायकोर्टात केला होता युक्तिवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती. तसेच, या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही युक्तिवाद केला होता. एम. आर. डागा यांचे चिरंजीव अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी ही आठवण सांगितली.सात दशके वकिली करणारे राम जेठमलानी यांचे रविवारी निधन झाले. ते अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये आरोपींच्या वतीने लढले होते. न्यायालयीन प्रकरणांच्या निमित्ताने त्यांचे काहीवेळा विदर्भात येणे झाले. त्यात अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्याचा समावेश आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयामध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. जेठमलानी यांनी या दोन्ही न्यायालयांमध्ये आरोपींच्या वतीने बाजू मांडताना आपल्या कायदेविषयक ज्ञानाने सर्वांना प्रभावित केले होते. नवोदित वकिलांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या.बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचे अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. काही महिन्यापूर्वी साईबाबासाठी जेठमलानी यांची सेवा घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. जेठमलानी यांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेही देण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे ती गाडी पुढे सरकली नाही. त्यांनी नागपुरात यावे, असे प्रत्येकाला वाटत होते.

टॅग्स :nagpurनागपूरadvocateवकिल