घातपातास पोषक पार्किंग व्यवस्था: ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ बेफिकीरदयानंद पाईकराव ल्ल नागपूरदररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगच्या माध्यमातून कधीही असामाजिक तत्त्व आपला हेतू साध्य करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पॅसेंजर लाऊंजच्या शेजारीच नव्हे तर अक्षरश: जेथून रेल्वेगाड्या ये-जा करतात त्या रेल्वे रुळाच्या बाजूलाही दुचाकी उभ्या करण्यात येत असल्यामुळे तेथे कधीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत रेल्वे प्रशासन कमालीची उदासीनता दाखवित असून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट कमिटी’ सुद्धा बेफिकीर असल्याचे दिसत आहे. त्वरित कारवाई करणार‘रेल्वे रुळाच्या शेजारी दुचाकी उभ्या राहत असतील तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गंभीर बाब आहे. याशिवाय संत्रा मार्केट भागाकडून रेल्वे रुळावरून दुचाकी चालविण्यात येत असल्यास तो सुद्धा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे त्वरित हे गंभीर प्रकार बंद करण्यात येतील.’- ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर विभाग
रेल्वेस्थानक रामभरोसे
By admin | Updated: June 30, 2015 03:02 IST