शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांचा भट्टाचार्य यांच्याविरोधात हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2017 01:43 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

नागपुरात केले पुतळ्याचे दहन : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारणारनागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करत नागपुरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, असे वक्तव्य भट्टाचार्य यांनी केले होते. याच्या निषेधार्थ राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांसमोर सकाळी ९ च्या सुमारास स्टेट बँकेच्या रेल्वे स्थानकाजवळील मुख्य शाखेसमोर पोहोचले. सुरुवातीला भट्टाचार्य यांच्या विरोधात घोषणा लावण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते.आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलने करून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. अनेक बँकांनी कॉर्पोरेट कंपन्यांसोबत डील केले आहे. उद्योजकांच्या कर्जाला माफी मिळते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्यांचा अपमान करण्यात येतो. हे चालणार नाही. शेतकरी गप्प राहणार नाही. आम्ही कर्जमाफी मिळवूनच राहू व यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व शेट्टी यांचे समर्थक उपस्थित होते. (प्रतिनिधी)