शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी देणार एनडीएला सोडचिठ्ठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:23 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याच्या अटीवरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रात एनडीएला समर्थन दिले होते.मात्र, दिलेल्या आश्वासनाबाबत केंद्र सरकार संवेदनशील दिसत नाही. त्यामुळे आता यापुढे एनडीएशी संबंध ठेवायचे का, याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे खा. शेट्टी म्हणाले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आले आहे. आता खोत हे मंत्रिपदावर भाजपाकडून आहेत की स्वाभिमानीच्या कोट्यातून याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.खोत यांचा विधान परिषदेचा अर्ज भरताना भाजपाने स्वत:चा ए-बीफॉर्म जोडून तेव्हाच धोका दिला होता. त्यानंतर सदाभाऊंचीही वागणूक बदलली. त्यांनी पुणतांबायेथील शेतकºयांचे आंदोलन तोडण्याचा प्रयत्नकेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार नाहीआपण केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत; पण त्यांना आधार नाही. आपण कधीही भाजपा नेत्यांकडे मागणी केलेली नाही. न मागता देईल एवढे भाजपाचे नेतृत्व उदारमतवादी नाही. मात्र, शेतकºयांचे प्रश्न न सोडविल्यामुळे केंद्र सरकारने मंत्रिपदाची आॅफर दिली तरी आपण ती स्वाकीरणार नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.