शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राजा ढाले यांना आंबेडकरी गौरव पुरस्कार

By admin | Updated: July 26, 2016 02:39 IST

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, मूर्तिकार, गीतकार आणि समता सैनिक दल व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकते ...

युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठान : भदंत सुरेई ससाई यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार वितरण नागपूर : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, मूर्तिकार, गीतकार आणि समता सैनिक दल व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकते दिवंगत मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ समता सैनिक दल व समता संगर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठानातर्फे ‘युगकवी केतन पिंपळापुरे आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. आंबेडकरी विचारवंत, तत्त्वचिंतक नेते व बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक राजा ढाले यांना यावर्षीचा पहिलाच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दी पीपल एराचे कार्यकारी संपादक सुदामदादा सोनुले, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे आणि राष्ट्रीय सहसंघटक सुनील सारीपुत्त यांनी सोमवारी सीताबर्डी येथील समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिशेष केतन पिंपळापुरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह काँग्रेसनगर येथे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते हा पुरस्कार राजा ढाले यांना प्रदान केला जाईल. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर अध्यक्षस्थानी राहतील. प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, डॉ. दीपक ठमके, केतकी केतन पिंपळापुरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला अनिल कांबळे, रितेश गायमुखे, सुधीर मेश्राम, अश्विन टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)