शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

राजा गौसची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने पेशी

By admin | Updated: April 5, 2015 02:23 IST

कच्चे कैदी पलायनाची कसून चौकशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असल्याने शनिवारी मोक्काचा आरोपी खतरनाक गुन्हेगार राजा गौस याची ...

नागपूर : कच्चे कैदी पलायनाची कसून चौकशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असल्याने शनिवारी मोक्काचा आरोपी खतरनाक गुन्हेगार राजा गौस याची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पेशी होऊन त्याला पुढची तारीख २९ एप्रिल देण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशीची कार्यवाही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) चे विशेष न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयात पार पडली. न्यायालयात आरोपीचे वकील अ‍ॅड. आर. के. तिवारी उपस्थित होते. राजा गौसला कारागृहातून न्यायालयात आणण्यात येणार असल्याने सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी खुद्द सहपोलीस आयुक्त अनुपकुमार, परिमंडळ २ चे उपायुक्त संजय लाटकर हे सकाळी १० वाजताच न्यायालय आवारात दाखल झाले होते. जिल्हा न्यायालयाच्या दोन्ही गेटवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. न्यायालयात येणाऱ्यांची कसून झडती आणि विचारपूस केली जात होती. त्यानंतरच त्यांना आत सोडले जात होते. कारागृहात कैद्यांची कसून चौकशी सुरू असल्याने राजा गौसची प्रत्यक्ष न्यायालयीन पेशी शक्य नाही, असे न्यायालयाला कारागृह प्रशासनाकडून कळवण्यात आले. गौसची थेट पेशी होणार नसल्याच्या माहितीने दुपारी १२ वाजता अतिरिक्त बंदोबस्त काढून टाकण्यात आला. गौसची कारागृहात बसून पेशी झाली. मंगळवारच्या पहाटे राजाच्या टोळीतील सदस्य मोक्काचे आरोपी सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, बिशेनसिंग ऊर्फ फारूख ऊर्फ मुश्ताक उईके, सोएब खान ऊर्फ शिबू दानिश वलीमखान आणि इतर गुन्ह्यातील दोन आरोपी कारागृहातून पळून गेले. ११ जानेवारी २०१३ रोजी गोळीबार करून नंदनवन भागातील हिवरीनगर येथील महालक्ष्मंी ज्वेलर्स लुटल्याच्या घटनेनंतर राजा गौस आणि पलायन केलेल्या या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. न्यायालयात खटला सुरू होण्याच्या स्थितीत असतानाच हे तीन महत्त्वाचे आरोपी पळून गेले. (प्रतिनिधी)