आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून परप्रांतीय हॉकर्स संकटात आहेत. ही परिस्थिती राजकीय राज ठाकरे यांच्यामुळे ओढवल्याचा आरोप आ. अबू आजमी यांनी बुधवारी विधानसभा परिसरात केला. राज ठाकरे हे राजकीय गुंड असल्याचा त्यांनी उल्लेख केला.अबू आजमी यांनी विधानभवन परिसरात मुंबईची सुरक्षा धोक्यात आल्याचा उल्लेख असलेले फलक हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र गुंडनिर्माण सेना आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते हॉकर्सला मारून हाकलत आहेत. ते कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. सरकारला त्यांना पूर्वीच बसू घायला नको होते. ते २५ वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. सरकारने त्यांच्या रोजगाराचा बंदोबस्त करावा. बिहार, उत्तर प्रदेश येथील कोर्टाचे समन्स असतानाही राज ठाकरे कोर्टात हजर होत नाहीत. हॉकर्सप्रकरणी सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अबू आजमी यांनी केली.
राज ठाकरे राजकीय गुंड : अबू आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:51 IST
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून परप्रांतीय हॉकर्स संकटात आहेत. ही परिस्थिती राजकीय राज ठाकरे यांच्यामुळे ओढवल्याचा आरोप आ. अबू आजमी यांनी बुधवारी विधानसभा परिसरात केला.
राज ठाकरे राजकीय गुंड : अबू आझमी
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यातपरप्रांतीय हॉकर्स संकटात