शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचाय!

By admin | Updated: September 27, 2015 02:28 IST

शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे.

विठ्ठल वाघ : मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी मतांच्या ध्रुवीकरणाला प्रारंभ नागपूर : शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे संघटन प्रभावी नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण फार व्यथित होतो. त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या जगण्याचीच मग कविता होते. संमेलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. विदर्भातील ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी यंदा संमेलनाध्यक्ष होण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल तीन दिवस विदर्भातील मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. वैदर्भीयांसह विदर्भ साहित्य संघाचा पाठिंबा मला मिळतो आहे, असे ते म्हणाले. मुळात ज्येष्ठ साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होण्यासाठी एवढी पायपीट करावी लागणे दुर्दैवी आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानानेच देण्यात यावे, याबाबत अनेकदा आपण आग्रही मागणी केली; पण लोकशाही प्रक्रियेमुळे काही बाबींना इलाज नसतो. महामंडळाच्या घटनेतच त्यासाठी सुधारणा करण्याची गरज आहे. कारण लोकशाहीच्या नावाखाली होणारी ही निवडणूक म्हणावी तशी पारदर्शक होत नाही. वेगवेगळे दबाव गट आणि त्यांचे राजकारण या निवडणुकीतही चालतेच. निवडून आलो तर शेतकऱ्यांसाठी व मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी काम करणार, आहे. आतापर्यंत साहित्यिक म्हणून मिरविले नाही, कारण मी जे अनुभवले तेच मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे दु:ख जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच १० शेतकरी कुटुंबांना उभे करण्यासाठी काही मदत केली. साहित्य संमेलन शासनाच्या अनुदानावर होते, त्याला आपला विरोध आहे. मराठी भाषेच्या उत्सवात राजकारणाचा प्रभाव नसलाच पाहिजे; कारण साहित्य हे माणसाच्या जगण्याच्या संवेदना मांडणारे क्षेत्र आहे.(प्रतिनिधी)विचारवंतांची हत्या हा सांस्कृतिक दहशतवादच दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या होणे समाजासाठी दुर्दैवी आहे. विचारांचा विरोध करण्यासाठी वैचारिक पात्रता असावी लागते. ज्यांची पात्रता नसते असेच लोक हत्येसारखे भ्याड कृत्य करतात. समाजात वेगवेगळ्या विचारांचे लोक असणे हीच समाजाची समृद्धता आहे. यात वैचारिक संघर्ष अटळ आहे. असा संघर्ष समाजाला समोर नेणारा असतो. पण वैचारिक संघर्षात मात मिळत असेल तर विचारवंतांची हत्या करणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. अशा लोकांपासून सावध राहायला हवे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे, असे मत विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.