शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली आहे. त्यातच जलालखेडा परिसरात सात दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील पिके पाण्याअभावी करपण्याची व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. आर्थिक अडचणींमुळे शासनाने दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

आठवडाभरापूर्वी तालुक्यात सर्वदूर सलग तीन दिवस पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी आटाेपली. त्यातच चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे अंकुरण्याच्या पूर्वीच शेतातील मातीचा वरचा थर कडक यायला सुरुवात झाली. या काळात जमिनीचा वरचा भाग ओलसर असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या अंकुराला जमिनीचा कडक भाग छेदून बाहेर येणे शक्य नसल्याने काही अंकूर आतच मृतवत हाेतात तर काही बाहेर आल्यावर उन्हाच्या तीव्रतेमुळे काेमेजतात. हा प्रकार जलालखेडा परिसरात अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे.

शेतकरी आधीच संकटात असून, त्या दुबार पेरणीच्या संकटाची भर पडल्यास पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण हाेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने बियाणे व खते खरेदी करावी लागणार असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

पीककर्ज मिळणे अवघड

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फारसे उत्पादन न झाल्याने पीककर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच बॅंका जुन्या पीककर्जाचे नुतनीकरण केल्याशिवाय नवीन पीककर्ज देण्यास तयार नाही. दुबार पेरणीची वेळ ओढवल्यास बियाणे, खते खरेदी करण्यास पैसा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

...

मी साेमवारी पेरणी केली. त्यानंतर पावसाची एकही सर काेसळली नाही. जमीन कडक आली असून, बियाणे अंकुरले नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसे नाही. या निविष्ठा कुणीही उधारीत देत नाही. शासनाने वेळीच मदत न केल्यास शेती पडित ठेवावी लागणार आहे.

- दिलीप झरकर, शेतकरी,

जलालखेडा, ता. नरखेड.