शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर रिपरिप, नागपूर, भंडाऱ्यात सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST

नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवारी सर्वत्र पावसाची रिपरिप दिवसभर सुरू हाेती. रात्रीही पावसाचा जाेर कायम हाेता. ...

नागपूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवारी सर्वत्र पावसाची रिपरिप दिवसभर सुरू हाेती. रात्रीही पावसाचा जाेर कायम हाेता. नागपुरात सकाळपर्यंत २३.८ मिमी व दिवसभरात १५.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. त्या खालाेखाल भंडारा जिल्ह्यात २१.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला.

पावसाळी वातावरणामुळे नागपूरचे तापमान ४.७ अंशाने घटले. दिवसभरात २५.६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. विशेष म्हणजे दिवसा व रात्रीच्या तापमानात केवळ १.६ अंशाचा फरक राहिला. २४ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. शहरात सकाळी ६ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी ८.३० पर्यंत २३.८ मिमी पाऊस नाेंदविला गेला. दुपारी पुन्हा पावसाने जाेर धरला. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत ५७९.२ मिमी पावसाची लाेंद करण्यात आली आहे. म्हणजे मान्सून हंगामाचा ६० टक्के पाऊस या दाेन महिन्यात झाला आहे. दरम्यान विदर्भातील वर्धा, बुलडाणा, वाशिम वगळता सर्व जिल्ह्यात कुठे जाेरदार तर कुठे तुरळक पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भासह मध्य भारतात हाेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास आकाशात ढग कायम राहतील आणि येते दाेन-तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये अकाेला ७.३ मिमी, अमरावती ६.४ मिमी, बुलडाणा २.८ मिमी, वाशिम ५.२ मिमी व यवतमाळ २.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.

विभागातील पाऊस

जिल्हा आजचा पाऊस आतापर्यंतची नाेंद

नागपूर २३.८ मिमी ५७९.२ मिमी

वर्धा १.५ ५०६.९

भंडारा २१.४ ५७२.१

गाेंदिया ११.४ ५४१.६

चंद्रपूर ०.७ ७६९.४

गडचिराेली ३.५ ६१२.१

विदर्भातील प्रमुख प्रकल्पांचा जलसाठा

प्रकल्प आजचा साठा (दलघमी) टक्के

काटेपूर्णा ६६.०८ ६३.४२

ऊर्ध्व वर्धा ४३८.२८ ५७.४५

खडकपूर्णा ७९.१५ ५६.०५

बेंबळा १४२.४३ ६६.८९

इसापूर ९५८.५९ ६६.७६

अरुणावती १४५.३६ ६८.७५

नागपूर विभाग

गाेसेखुर्द ७२१.३२ ४२.६१

बावनथडी १३० ३०.८७

आसाेलामेंढा ४८.०३ ७१.४४

सिरपूर २९.८९ ११.६२

इटियाडाेह १५७.६८ २९.५६

ताेतलाडाेह ७९३.९९ ६३.३३

खिंडसी ३४.३२ ३३.३२

वडगाव ९९.०१ ६१.१६

नांद ३१.८४ ४२.९५

कामठी खैरी १२५.७९ ६१.१३