शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनुष्य’चे आयोजन लांबणीवर

By admin | Updated: October 12, 2015 02:45 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती.

नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती. परंतु नेमक्या याच कालावधीमध्ये दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागावर परिणाम लक्षात घेता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन समोर ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी नवीन तारखांना परवानगी दिली आहे. आता हे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरवर्षी ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ‘इंद्रधनुष्य’चे दरवर्षी विविध विद्यापीठांमध्ये आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा हा यामागचा उद्देश असतो. यंदा ही जबाबदारी नागपूर विद्यापीठाला देण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. नागपूर विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणीही घेण्यात आली. परंतु नोव्हेंबरमध्ये महोत्सवाच्या कालावधीतच दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थी किती प्रमाणात येतील, असा मुद्दा अचानक समोर आला. शिवाय अनेक विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षासुद्धा या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यात नागपूर विद्यापीठाचाही समावेश आहे. परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी महोत्सवामध्ये सहभागी होण्यास पुढाकार घेणार नाहीत व जर विद्यार्थीच राहणार नाहीत तर महोत्सवाची रंगत वाढणारच नाही ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने विचार सुरू केला. विद्यार्थ्यांच्या हातातील संधी जाऊ नये यासाठी ‘इंद्रधनुष्य’च्या तारखा पुढे ढकलण्याबाबत अधिकाऱ्यांचे एकमतदेखील झाले. परंतु या बदलासाठी राज्यपाल कार्यालयाची परवानगी आवश्यक होती. नागपूर विद्यापीठातर्फे याबाबतीत राज्यपाल कार्यालयाला पत्रदेखील पाठविण्यात आले. राज्यपालांनी संपूर्ण मुद्दा लक्षात घेत आयोजनाच्या तारखांमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. नुकतेच विद्यापीठाला त्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले. आता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाकडून तशी तर तयारी सुरू होतीच. परंतु आता हा महोत्सव समोर ढकलण्यात आल्यामुळे तयारीवर काहीही परिणाम पडणार नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांवर परीक्षांचे किंवा अभ्यासाचे फारसे दडपण राहणार नाही. त्यामुळे ‘इंद्रधनुष्य’ची रंगत आणखी वाढेल असा विश्वास नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. निहाल शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)