लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. १२) रात्री सुवरधरा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकत दारू काढणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये संजय देशराज भलावी (२८, रा. बनेरा, ता. पारशिवनी), शैलेंद्र लहू गजभिये (२९, रा. सुवरधरा, ता. पारशिवनी), धीरज उईके (२६) व मनीष रामप्रसाद उईके (२६) या चाैघांचा समावेश आहे. पारशिवनी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना सुवरधरा शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लगेच या शिवाराची पाहणी केली.
त्यांना जांभनाल्याच्या काठी माेहफुलाची दारूभट्टी आढळून येताच त्यांनी धाड टाकली व दारू काढणाऱ्या चाैघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ७२ हजार रुपयाची २४० लिटर मोहफुलाची दारू, ६० हजार रुपयाचा ६०० लिटर मोहफूल सडवा व ९, ४०० रुपयाचे दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार संतोष वैरागडे यांनी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, हरिहर सोनकुसरे, मुदस्सर जमाल, अमित यादव, प्रमोद कोठे यांच्या पथकाने केली.
130821\20210813_153612.jpg
दारू