शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काटाेल शहरातील सट्टापट्टी अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : पाेलिसांनी काटाेल शहरातील पेठबुधवार भागात सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्ड्यावर धाड टाकली. यात सट्टा स्वीकारणाऱ्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : पाेलिसांनी काटाेल शहरातील पेठबुधवार भागात सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्ड्यावर धाड टाकली. यात सट्टा स्वीकारणाऱ्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ७३ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २९) सायंकाळी करण्यात आली.

बंटी लक्ष्मण गाढवे (रा. पेठबुधवार, काटाेल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. काटाेल शहरातील पेठबुधवार भागात सट्टापट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी या भागाची पाहणी केली. तेथे सट्टापट्टी स्वीकारली जात असल्याचे आढळून येताच पाेलिसांनी धाड टाकली आणि सट्टापट्टी स्वीकारणाऱ्या बंटीला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ७३ हजार २८५ रुपये राेख आणि सट्टापट्टी नमूद करण्याचे साहित्य असा एकूण ७३ हजार ३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. आपण ही सट्टापट्टी युनूस शेख (रा. आययूडीपी, काटोल) याच्या सांगण्यावरून स्वीकारत असल्याची माहिती बंटीने पाेलिसांना दिली. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे, जयसिंग पवार, अविनाश बाहेकर, दीपक जोगेकर, सुचिता गुप्ते यांच्या पथकाने केली.