शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:23 IST

वर्धा येथील जाहीर सभा आटोपून अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे दिल्लीला रवाना होण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे शेवटी राहुल गांधी कारने नागपूरला पोहचले व रात्री ७.४५ च्या सुमारास चार्टर फ्लाईटने दिल्लीला रवाना झाले.

ठळक मुद्देकारने पोहचले नागपूरला : विमानाने दिल्ली रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा येथील जाहीर सभा आटोपून अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे दिल्लीला रवाना होण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. त्यामुळे शेवटी राहुल गांधी कारने नागपूरला पोहचले व रात्री ७.४५ च्या सुमारास चार्टर फ्लाईटने दिल्लीला रवाना झाले.वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर राहुल गांधी यांची सभा झाली. सभा ठिकाणाच्या बाजूलाच त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले होते. अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव व विदर्भ प्रभारी आशिष दुआ व माजी मंत्री नसीम खान यांचे दुसरे हेलिकॉप्टर सेवाग्रामला उतरले होते. सुमारे ५.५० वाजता सभा आटोपली. सभेनंतर राहुल गांधी हे हेलिकॉप्टरमध्ये बसले. तोवर दुआ व नसीम खान हे सेवाग्रामच्या हेलिपॅडकडे निघाले. त्यांचे हेलिकॉप्टर उडाले मात्र, राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर बराच वेळ प्रयत्न करूनही सुरू झाले नाही. शेवटी त्यांनी कारने नागपूरला येण्याचा निर्णय घेतला. गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे रात्री ७.३० वाजता कारने नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर राहुल गांधी हे चार्टर विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधी