शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कर्जमाफी नव्हे शेतकरी फसवणूक योजना; रघुनाथ पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 14:37 IST

कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मदत करण्याची मागणीकर्जमाफीच्या घोषणेचा बोजवारा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कर्ज माफीच्या आकड्यांचा घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.रघुनाथ पाटील म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विदर्भात फिरत आहोत. नागपूरनंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील परिस्थिती जाणून घेणार आहोत. सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा बोजवारा उडाला आहे. कर्जमाफीच्या योजनेत आकड्यांचा घोळ घालण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकरी आत्महत्येबाबत सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. आता प्रत्यक्षात तेच सत्तेत असतानाही आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कर्ज माफीतर नाहीच परंतु शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नाही, शेतीमालाला भाव नाही आणि त्यातच विज बिलाचा भार अशा संकटात शेतकरी सापडला आहे. कापसावर बोंडअळी येणार नाही, असा कंपन्यांनी दावा केला होता. परंतु बोंडअळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील कापसाचे पिक बुडाले आहे. या कंपन्यांकडुन नुकसान भरपाई वसुल करून शासनाने ती शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. शेतीकडे बघण्याचा राज्य सरकारचा दृष्टीकोण वाईट आहे. याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. दाळीवरील निर्यात बंदी कायमस्वरुपी उठविण्यात आली नाही. गोवंश हत्या बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाकड जनावरे विकता येत नसल्यामुळे त्यांना पाळण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. वास्तविक ही जनावरे शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड होते. गरज भासली की ते विकता येत होते. पंजाब व कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना मोफत विज आहे. परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कोणत्याच सवलती नाहीत. उद्योगपतींना मात्र कोट्यवधींची मदत केल्या जात असल्यामुळे हे सरकार आहे की व्यापारी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेत सुकाणु समितीचे सदस्य किशोर ढमाले, गणेश जगताप, दिनकर दाभाडे, विजयकुमार शिंदे उपस्थित होते.‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीकॉंग्रेस शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे. पण त्यात शेतकरी सहभागी होतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मोर्चा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असाच प्रकार असल्याचा उपरोधिक टोला रघुनाथ पाटील यांनी लगावला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी काहीच अंमलात आणल्या नाहीत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबाबत बोलण्याचा काडीमात्र अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारण