शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रफीच्या आठवणींचा ‘अ लिजेन्ड फॉर लिजेन्ड’

By admin | Updated: November 10, 2014 01:01 IST

कर्णमधूर व पहाडी आवाजाचे धनी असणारे हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज गायक म्हणजे मोहमंद रफी. रफी यांनी अभिनेता दिलीप कुमार, देव आनंद व शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेल्या सुरेल गीतांचा

कादर यांच्या आवाजातला सुरेल नजराणा नागपूर : कर्णमधूर व पहाडी आवाजाचे धनी असणारे हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज गायक म्हणजे मोहमंद रफी. रफी यांनी अभिनेता दिलीप कुमार, देव आनंद व शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेल्या सुरेल गीतांचा कार्यक्र म नागपुरातील प्रसिद्ध गायक एम.ए. कादर यांनी सादर केला. श्रोत्यांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. स्थानिक साई सभागृहात क ादर इंटरनॅशनलच्यावतीने ‘अ लीजेन्ड फॉर लीजेन्ड’ हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. मोहमंद रफी यांनी सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या आवाजाने नवी ओळख दिली. हिंदी सिनेमाचे नाव घेताना ज्या महान कलाकारांचे स्मरण होते अशा कलाकारांत गायक मोहम्मद रफी यांना आदराचे स्थान आहे. करोडो श्रोत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून मोहम्मद रफी यांचा उल्लेख करता येतो. रफींचे अनेक दिवाने आहेत. नागपुरातील एम.ए. कादर यांच्या आॅक्रे स्ट्रामध्ये त्यांनी गायिलेले गाणी मोहम्मद रफी साहेबांचीच असतात. याची प्रचिती पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली. कार्यक्रमाला असलेली गर्दी कादर यांची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे सांगून गेली. यावेळी एकापेक्षा एक सरस गीते कादर व त्यांच्या चमूने सादर केली. ‘तारीफ करू क्या उसकी’ हे गीत सादर करीत त्यांनी थेट प्रेक्षकांतून ‘एन्ट्री’ केली. प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत व त्यांचे अभिवादन स्वीकारत कादर मंचावर आले. यानंतर कादर यांनी रफी साहेबांनी गायिलेली एकाहून एक सरस गीते सादर केली. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’, ‘क्या से क्या हो गया’, ‘मधुबन मे राधिका’, ‘ये देश है वीर जवानो का’, ‘आज की रात मेरे’, ‘मुझे दुनिया वालो’ यासारखे एकाहून एक सरस गीते सादर केली. कादर यांच्या व्यतिरिक्त झीनत कादर, भरत मेहता, मोहमंद हुसैन, समृद्धी यांनी देखील गीते सादर केली. संचालन किशन शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)