शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

नियमांना धाब्यावर बसवून धावताहेत रेडियो कॅब

By admin | Updated: August 27, 2016 02:11 IST

शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : परमिटशिवाय सुरू आहे व्यवसायनागपूर : शहरवासीयांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेडियो कॅब नियमांना धाब्यावर बसवून धावत आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या अनेक संचालकांकडे परमिट नसून चालकाच्या मनात येईल तिथे हे वाहन उभे केले जात असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाहने आॅल इंडिया परमिट असलेली आहेत. परंतु ज्यासाठी हे परमिट मिळवले ते सोडून स्थानिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. आॅल इंडिया परमिटच्या नावावर करात सूट मिळवून शासनाला चुना लावला जात आहे. विशेष म्हणजे, कॅबच्या या गोरखधंद्याकडे परिवहन विभागाचे अजिबात लक्ष नाही. समन्वयच नाहीरेडियो कॅब ही मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून संचलित होते. यात वाहनाचा मालक कुणी वेगळा असतो आणि चालक कुणी वेगळा. याबाबतची सर्व माहिती पोलीस अन् परिवहन विभागालाही नसते. फक्त कमिशन लाटण्यासाठी कॅबला कंपनीशी जोडून प्रवासी वाहतुकीची मुभा दिली जाते. चौकशी का होत नाही?मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार, खासगी टॅक्सीला शहरात चालविण्यासाठी आरटीओची परवानगी घेणे आवश्यक आहे. परमिट देण्याआधी आवश्यक पार्किंग स्थळ आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. या निकषांच्या पडताळणीनंतर परमिट दिले जाते. परंतु रेडियो कॅब या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. रेडियो कॅबचे शहरात कार्यालय नाही अन् पार्किंगसाठी निर्धारित जागाही नाही. वाहनांचा दुरुपयोग!मिळालेल्या माहितीनुसार, कॅबने केलेल्या प्रवासाची सर्व माहिती अ‍ॅपमध्ये नोंदविली जाते. परंतु वेळेचे काही बंधन नसते. याचा गैरफायदा काही लोक घेतात. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये पकडले जाऊ नये म्हणून कॅबचा वापर केला जातो. सुविधेच्या नावावर वाहनातच मद्यपानाची सूटही दिली जाते. चालकांची खासगी माहिती उपलब्ध नाहीकॅब चालवणारे अनेक चालक स्थानिक नसल्याने त्यांची खासगी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. शहरात धावणाऱ्या बहुतेक कॅब पर जिल्ह्यातील व प्रदेशातील चालक चालवत असतात. अनेकदा होतात भांडणेस्थानिक आॅटो आणि टॅक्सीचालकांनी कॅबवर कारवाईची मागणी अनेकदा केली आहे. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर सवारी मिळवण्यावरून आॅटो आणि कॅबचालकांमध्ये भांडण ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. हे टाळण्यासाठी आता कॅबचालकांनी रेल्वे स्टेशन फ्लायओव्हर आणि कस्तूरचंद पार्कजवळ डेरा टाकणे सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या आॅटो चालक युनियनच्या कृती समितीने ३१ आॅगस्टला बंदची घोषणा केली आहे. युनियनचे पदाधिकारी अल्ताफ अन्सारी सांगतात, ई-रिक्षा आणि रेडियो कॅबमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. नियम धाब्यावर बसवूनसुद्धा कुणीच या लोकांविरुद्ध कारवाई करीत नाहीत.