शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर हेराफेरी

By admin | Updated: July 13, 2017 02:33 IST

पल्सर चीपचा वापर करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे.

कडबी चौकातील प्रकार : वैधमापनशास्त्र विभाग व गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पल्सर चीपचा वापर करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. याअंतर्गत बुधवारी कडबी चौकातील के.एस. लांबा अ‍ॅण्ड कंपनीच्या पेट्रोल पंपावर छापा घालून तपासणी करण्यात आली. या वेळी ग्राहकांना कमी पेट्रोल दिले जात असल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पथक, तेल कंपन्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वैधमापनशास्त्र विभागाच्या चमूने केलेल्या तपासणीत पंपाच्या दोन नोझलमध्ये गडबड असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ग्राहकांना कमी पेट्रोल मिळत होते. याप्रकरणी पंप मालकाला कायदेशीर नोटीस बजावत पाच हजार रुपयांचा दंड भरण्याचे व संबंधित नोझलची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत चालली. पंपाला पल्सर चीप लागली आहे का, याची खातरजमा करण्यासाठी पंपाच्या मशीनची तपासणी करण्यात आली. त्यावेळी नोझलमध्ये गडबड असल्याचे दिसून आले. प्रति पाच लिटर पेट्रोलमागे एका नोझलमध्ये २० मिलीलिटर तर दुसऱ्या नोझलमध्ये १५ मिलीलिटर पेट्रोल कमी दिले जात होते. या गडबडीसाठी पंप मालक करतारसिंह लांबा यांना वजन व मापे अधिनियम, १९७६ अंतर्गत नोटीस देण्यात आली. ही कारवाई वैधमापन विभागचे सहनियंत्रक एच.टी. बोकडे यांच्या पथकाने केली. गुन्हे शाखा पोलिसांकडून मात्र पंप मालकाविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सहा तास कशाची तपासणी केली? ही कारवाई दुपारी १२ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ पर्यंत चालली. जर फक्त पंपाच्या नोझलमध्ये गडबड होती तर तब्बल सहा तास नेमकी कशाची तपासणी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पंपावरील गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशीही शंका निर्माण झाली आहे. नागरिकांच्या नुकसानीचे काय? कडबी चौकातील पेट्रोल पंपावर धाड घालण्यात आल्यामुळे तेथे होणाऱ्या पेट्रोल लुटीचा पर्दाफाश झाला. मात्र, नेमके किती दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता, हे सांगणे कठीण आहे. या प्रकारामुळे ग्राहकांना आजवर कमी पेट्रोल मिळाल्याने झालेल्या नुकसानाबाबत वैधमापन विभाग, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.