शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील समस्या त्वरित सोडवा

By admin | Updated: October 3, 2016 02:53 IST

मिहानमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी

आढावा बैठक : नितीन गडकरी यांचे निर्देश नागपूर : मिहानमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी आणि उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची शनिवारी एकत्रित बैठक घेतली. गडकरी यांनी उद्योगांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यात आला. पोलीस चौकी, मोबाईल कव्हरेज, मिहान क्षेत्राचे सौंदर्यीकरण आदींसह अनेक समस्या सोडविण्याचे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दोन वर्षांत ३६ कंपन्यांनी नागपुरात उद्योग सुरू केले आहेत. टीसीएस, एअर इंडिया एमआरओ, टेक महिन्द्र, इन्फोसेप्ट, एमआरआर सॉफ्ट, फ्यूचर ग्रुप, टाल, पतंजली इत्यादी कंपन्यांचा उल्लेख करता येईल. आजपर्यंत एकूण ९ हजार ३७८ युवकांना मिहानमध्ये रोजगार मिळाला असून ४ हजार ९७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती बैठकीत चर्चेदरम्यान मिळाली. दोन वर्षांत रोजगाराचा आकडा ५० हजारांवर जाणार आहे. कंपन्यांना कुशल कामगार मिळावेत म्हणून अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी नागपूर आणि विदर्भातील युवकांना संधी द्यावी, असे गडकरी यांनी बैठकीत सांगितले. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी गडकरी प्रयत्नरत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या प्रकल्पासाठी त्यांनी दोन वर्षांत २१ हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. बहुतांश कामे सुरू झालेली आहेत. मिहान प्रकल्प हा विदर्भाचा विकासाचा मार्ग ठरणार आहे. मिहानमध्ये नवीन उद्योग यावेत, यासाठी गडकरी प्रयत्नरत आहेत. फूड पार्कमध्ये पतंजली तसेच रिलायन्स एरो स्ट्रक्चर्स, एचसीएल हे उद्योग लवकरच काम सुरू करणार आहे. या कंपन्यांमध्ये वैदर्भीय युवकांना रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. बैठकीत मिहानमध्ये कार्यरत सर्व कंपन्यांचे आणि मिहानचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)