शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवा

By admin | Updated: April 16, 2017 01:50 IST

शहरातील आग्याराम देवीच्या १.१४ एकर जागेवर असलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

आग्याराम देवी मंदिर : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश नागपूर : शहरातील आग्याराम देवीच्या १.१४ एकर जागेवर असलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.मंदिराच्या एकूण ६.८६ एकर जागेचा वाद पालकमंत्र्यांसमोर आला. मंदिराचे व्यवस्थापन म्हणते ही जागा मंदिराची आहे. पण काही जण म्हणतात जागा आमची आहे. मंत्रालयातून यापूर्वी निघालेल्या आदेशानुसार ही जागा मंदिराच्या ट्रस्टची आहे, असा दावा मंदिराच्या विश्वस्तांनी केला आहे. असे असतानाही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. ६.८६ एकर जागा मंदिराच्या व्यवस्थापनाच्या नावाने नोंद करावी, अशी मागणी विश्वस्तांची होती. ५५/५४ च्या अभिलेखानुसार ही जागा कोठारी व नासुप्रची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रेकॉर्डवर आग्याराम देवीचे नाव व ताबा दुसऱ्यांचा असल्याकडेही विश्वस्तांनी लक्ष वेधले. ज्यांच्या नावाने ही मूळ जागा होती ते सध्या हयात नाहीत. तिघांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचेही पालकमंत्र्यांना सांगण्यात आले.विश्वस्तांनी या संदर्भात नासुप्रकडे कागदपत्रांची मागणी केली असता नासुप्रतून फाईलच गायब झाल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी कार्यालयही या जागेसंदर्भातील कागदपत्रे दाखवीत नसल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली. हा जागेचा वाद न्यायालयातच सुटू शकतो. आधी मंदिराच्या १.१४ एकर जागेवरील अतिक्रमण हटवून उर्वरित जागेसाठी विश्वस्त न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)