शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन उड्डाणपूल त्वरित पाडा

By admin | Updated: May 23, 2017 02:04 IST

रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत.

गणेश टेकडी मंदिर व जनआक्रोशतर्फे स्वाक्षरी अभियान सुरूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत. मानस चौक व जयस्तंभ चौकाला जोडणारा हा पूल दोन्ही चौकात वाहतुकीची कोंडी करणारा ठरला असून, गणेश टेकडी मंदिरात जाणाऱ्या भाविकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे हा फ्लायओव्हर पाडण्यात यावा, या मागणीसाठी अ‍ॅडव्हायजरी सोसायटी आॅफ गणेश टेम्पल व जनआक्रोश संघटनेने सोमवारपासून स्वाक्षरी अभियान सुरू केले. जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याविषयी माहिती दिली. दहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या उड्डाणपुलाला त्यावेळीही विरोध झाला होता. मात्र प्रशासनाने विचाराअभावी याचे बांधकाम केले. या पुलामुळे रेल्वे स्टेशन आणि टेकडी मंदिरात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. मानस चौकासह मेयो रुग्णालयाकडून व एलआयसी, आरबीआयकडून येणारी वाहने जयस्तंभ चौकात धडकतात. त्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. नागरिकांना दररोज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. वन-वे असल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय या पुलामुळे ऐतिहासिक जयस्तंभ चौकाचीही दुर्दशा झालेली आहे. वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी फ्लायओव्हर बांधण्यात येतो. मात्र दुर्दैवाने या पुलामुळे सोय होण्याऐवजी अडचणीच अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रयोजन नसताना अविचारीपणे या पुलाचे बांधकाम केल्याची टीका कासखेडीकर यांनी केली. या अनेक समस्या पाहता हा पूल त्वरित पाडण्यात यावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. टेकडी मंदिर सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिकराव जवंजाळ यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली. मोहिमेंतर्गत एक लक्ष लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारला निवेदन सोपविणार असल्याचे कासखेडीकर यांनी सांगितले. यासाठी रेल्वे विभागासह विविध ठिकाणी हे अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.न्यायालयानेही व्यक्त केली होती नाराजी२०१० ला एका जनहित याचिकेंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या पुलाच्या बांधकामाविषयी ताशेरे ओढले होते. पुलाखाली तयार केलेले १८० गाळे व्यावसायिकांना वितरित करण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर होतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी न्यायालयाने महापालिकेसह नासुप्र, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी तसेच रेल्वे विभागालाही नोटीस बजावली होती. त्यानंतरही पुलासंदर्भात निर्णय होत नसल्याने ही न्यायालयाच्या आदेशाची अवमानना असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेत गणेश मंदिर सोसायटीचे श्रीराम कुळकर्णी, संगम दडवी, प्रकाश कुंटे, विकास लिमये, संजय जोगळेकर आदी उपस्थित होते.