शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता अपघाताची मिळणार त्वरित माहिती

By admin | Updated: March 29, 2017 02:41 IST

शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात.

विनाहेल्मेट गाडीही होणार नाही ‘स्टार्ट’ : सहा विद्यार्थिनींनी तयार केले ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’ सुमेध वाघमारे   नागपूर शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही वाहनचालक याला गंभीरतेने घेत नाही. यातच अपघात झाल्यास उशिरा मदत मिळत असल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो. याची दखल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी घेतली. त्यांनी तयार केलेल्या ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मुळे हेल्मेटशिवाय गाडी तर स्टार्ट होणारच नाही, शिवाय अपघात झाल्यास याची माहिती घरच्यांना मिळेल. जखमीला तत्काळ मदत पोहचविणे शक्य होईल. संशोधनाच्या क्षेत्रात केव्हा कसा, आणि कोणता शोध लागेल आणि नवीन काय हाती येईल, याचा नेम नाही. असाच एक प्रयोग प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज, डिगडोह हिंगणाच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’च्या अंतिम वर्षाच्या मौसम, अदिती वराडे, नेहा गजभिये, तक्षशीला हाडके, मिनाक्षी खरवडे आणि पारुल नगरकर या सहा विद्यार्थिनींनी केला. दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’ हे नवखे उपकरण तयार केले. याचे प्रात्याक्षिक नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांना दिले. हे उपकरण सर्व दुचाकी चालकांच्या फायद्याचे असल्याचे आरटीओचे प्रमाणपत्रही त्यांना मिळणार आहे. या ‘हेल्मेट बँड’चे अनेक फायदे आहेत. यात वाहनचालकाला सुरक्षा तर मिळेल सोबतच वाहतुकीचे नियम पाळता येईल. आपली काळजी घेणाऱ्यांना आपण कुठे आहात याची माहिती मिळेल, वाहन चोरी टळेल व अपघाताची त्वरित माहिती आप्तांना मिळेल. अपघाताचा मोबाईलवर येईल मॅसेज ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकाचे ‘लोकेशन’ त्याने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘जीएसएम’ मार्फत पोहचविल्या जाते. यामुळे वाहनचालकाचे ठिकाण (लोकेशन) कळते. यातच अपघात झाल्यास याची माहितीही संबंधित मोबाईलवर येते. परिणामी, जखमीला तत्काळ मदत मिळू शकेल. शिवाय, अपघातग्रस्त वाहनातून ‘बझर’ वाजत राहील व ‘एलईडी’ लाईट लागणार असल्याने रहदारी करणाऱ्यांचे लक्षही वेधून घेईल. (प्रतिनिधी)