लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील आठ हॉटेल ‘कोविड केअर सेंटर’मध्ये परिवर्तीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या हॉटेलमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे नसलेले ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहू शकतील. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये डॉक्टर व परिचारिका उपलब्ध करण्यात येतील.सोमवारी हॉटेल मालक व मनपा प्रशासन यांच्यात यासंदर्भात बैठक झाली. हॉटेलमध्ये स्थापित करण्यात येणाऱ्या ‘कोविड सेंटर’च्या रुग्णांना शुल्क द्यावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र आजच्या बैठकीत शुल्क निश्चित होऊ शकले नाही. हॉटेल मालकांनी आपापले शुल्क निश्चित करून मनपाला यासंदर्भात माहिती द्यावी, असे सुचविण्यात आले. कोणत्याही हॉटेलला निर्धारित शुल्काहून अधिक रक्कम घेता येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. शहरातील आठ हॉटेल ‘कोविड केअर सेंटर’मध्ये परिवर्तित करण्यासंदर्भात व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. अद्याप दर निश्चित झालेले नाही. पॉझिटिव्ह रुग्ण शुल्क अदा करून येथे उपचार घेऊ शकतील.आता हॉटेलसोबत थेट चर्चाज्या हॉटेलमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ बनविण्यात येणार आहेत, यातील बहुतांश हॉटेलमध्ये ‘क्वारंटाईन सेंटर’ सुरू आहेत. या हॉटेलमध्ये ‘क्वॉरंटाईन सेंटर’ सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व हॉटेल असोसिएशन यांच्यात करार झाला होता. परंतु त्यांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात व्यक्तिगत स्तरावर निर्णय घ्यावयाचा आहे. त्यामुळे आता हॉटेल व्यवस्थापनाची चर्चा होत असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू यांनी दिली.
नागपुरात आठ हॉटेलमध्ये होणार ‘क्वारंटाईन सेंटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:45 IST
शहरातील आठ हॉटेल ‘कोविड केअर सेंटर’मध्ये परिवर्तीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या हॉटेलमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे नसलेले ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहू शकतील. त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये डॉक्टर व परिचारिका उपलब्ध करण्यात येतील.
नागपुरात आठ हॉटेलमध्ये होणार ‘क्वारंटाईन सेंटर’
ठळक मुद्देअद्याप दर निश्चित नाही : मनपाचे हॉटेल मालकांना दर निश्चित करण्याचे आवाहन