शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

३० रेल्वे कोचमध्ये ‘क्वॉरंटाईन सेंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता ३० रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता ३० रेल्वे कोचला ‘क्वॉरंटाईन’केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे. नागपूरसह वर्धा व आमलामध्ये हे केंद्र आहेत. राज्य शासन व महानगरपालिकेच्या विनंतीवर ‘क्वारंटाईन’ केंद्र सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी दिली. ‘आॅनलाईन’ पत्रपरिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.

यावेळी ‘लोकमत’ने रेल्वेच्या कर्मचाºयांबाबत प्रश्न केला. त्यावेळी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ६५० कर्मचारी ‘कोरोना’बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली. इटारसे ते बल्लारशाहपर्यंत असलेल्या नागपूर विभागात सद्यस्थितीत ६५० कर्मचाºयांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. ७५ कर्मचारी इस्पितळात उपचार घेत असून ४७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात २७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. रेल्वे इस्पितळात कार्यरत ८ डॉक्टर आणि १६ पॅरामेडिकल स्टाफला ‘कोरोना’च्या नियंत्रणासाठी मनपाच्या सेवेत देण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाºयांचा ‘कोरोना’पासून बचाव करण्यासंदर्भात सर्व उपाय केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.