शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

हॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:24 IST

संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार विधेयक मांडणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.समाजामध्ये डॉक्टरांना देवाचा दर्जा आहे, पण काही डॉक्टर सेवा सोडून फक्त व्यवसाय म्हणून याकडे बघत आहे. बरेचदा काही आवश्यकता नसताना फक्त कमिशन मिळणे, विदेशवाऱ्या, महागड्या भेटवस्तू मिळण्याच्या लोभापोटी अनावश्यक विविध प्रकारच्या ठराविक लॅबमधूनच महागड्या चाचण्या करणे, सिटी स्कॅन, होल बॉडी स्कॅन वगैरे चाचण्या करून रुग्ण-ग्राहकांना लुटण्याचा प्रकार निंदनीय असून तो वारंवार वाढतच आहे. याबाबत ग्राहक पंचायतने तसेच बऱ्याच प्रामाणिक डॉक्टरांनीही वारंवार आवाज उठविला आहे, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.९० टक्के हॉस्पिटलमध्ये स्वत:ची पॅथॅलॉजी लॅब आणि औषध दुकाने थाटली असून तिथे आलेल्या रुग्ण-ग्राहकांना त्याच दुकानामधूनच व ठराविक कंपन्यांचीच औषध घेणे बंधनकारक आहे.किंबहुना लिहून दिलेली औषधे व इतर साहित्य इतरत्र औषध दुकानात मिळतच नसल्यामुळे नाईलाजाने विकत घ्यावे लागतात. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच सरकारी डॉक्टरही लुटारू झाले आहेत. अर्थातच हे सर्व कमिशन, विदेश दौरे, महागड्या भेटवस्तू व इतर प्रलोभनाकरिता केले जात असल्याच आरोप पांडे यांनी केला.

कट प्रॅक्टिस म्हणजे काय?एखाद्या डॉक्टरने रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठविल्यानंतर संबंधित डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरुपात पैसे घेणे किंवा आवश्यकता नसताना रुग्णांना ठराविक प्रयोगशाळेमधूनच तपासण्या करण्यास भाग पाडणे आणि संबंधित प्रयोगशाळेकडून मोबदला घेणे, तसेच रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधे घेण्याचा आग्रह धरणे आणि त्या बदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे, महागडी भेटवस्तू घेणे.रुग्णसेवेचा धंदा मांडणाऱ्या व संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र शासन मार्च-२०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘कट प्रॅक्टिस’वर बंदी आणणारे विधेयक आणणार आहे. कठोर कायदा करून रुग्ण-ग्राहकांची पिळवणूक व लूटमार थांबवावी, अशी मागणी गजानन पांडे, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, नरेंद्र कुळकर्णी, राजीव जगताप, अ‍ॅड. गौरी चांद्रायण, अ‍ॅड विलास भोसकर, अ‍ॅड प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, तृप्ती आकांत व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल