शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विकास ठाकरे यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर विकास ठाकरे यांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. त्यांनी महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यत्वासाठी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महापालिकेतील एन्ट्रीला पूर्णविराम लागला आहे. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक किशोर जिचकार यांचा नामनिर्देशित सदस्यपदाचा मार्ग ...

ठळक मुद्देहायकोर्टाने याचिका फेटाळली : किशोर जिचकार यांचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर विकास ठाकरे यांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. त्यांनी महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यत्वासाठी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महापालिकेतील एन्ट्रीला पूर्णविराम लागला आहे. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक किशोर जिचकार यांचा नामनिर्देशित सदस्यपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा आज, शनिवारी होऊ घातली आहे. तीत जिचकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. नगरसेवक तानाजी वनवे यांची १६ मे रोजी गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निवडीची १९ मे रोजी नोंदणी केली असली तरी, ते १६ मेपासूनच गटनेते झाले होते. त्यामुळे जिचकार यांनी १८ मे रोजी वनवे यांच्या पाठिंब्याने सादर केलेला नामनिर्देशित सदस्यत्वाचा अर्ज वैध ठरतो असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.ठाकरे यांनी जिचकार यांच्या नामांकन अर्जावर विविध आक्षेप घेतले होते. नामनिर्देशित सदस्यत्वासाठी नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होती. विभागीय आयुक्तांनी वनवे यांची गटनेतेपदी नियुक्तीची १९ मे रोजी नोंदणी केली. परिणामी ते १९ मेपासून गटनेते झाले. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याने १८ मे रोजी सादर केलेला नामांकन अर्ज स्वीकारता येणार नाही असे ठाकरे यांचे म्हणणे होते. ठाकरे यांचा दावा फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने स्वत:च्याच ३१ आॅगस्टच्या निर्णयाचा आधार घेतला. त्या निर्णयाद्वारे न्यायालयाने महाकाळकर यांची वनवे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती.त्यामुळे वनवे यांची नियुक्ती १६ मेपासूनच वैध ठरली होती. ठाकरे यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. शंतनू खेडकर, वनवे यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, महाकाळकर यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा, जिचकार यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे महानगरपालिकेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व अ‍ॅड. जेमिनी कासट तर, काँग्रेसतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.अशा आहेत घडामोडीमहानगरपालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. काँग्रेसने सुरुवातीला नगरसेवक संजय महाकाळकर यांची निर्धारित प्रक्रियेद्वारे गटनेतेपदी निवड केली होती. त्यांनी गटनेतेपदाची सूत्रे स्वीकारून कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी महाकाळकर यांच्या पाठिंब्याने नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्ज सादर केला होता. दरम्यान, महाकाळकर यांच्याविरुद्ध १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सदस्यांची बैठक झाली. त्यात वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेऊन विभागीय आयुक्तांना १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी आदेश जारी करून महाकाळकर यांना गटनेतेपदावरून कमी केले व वनवे यांची गटनेतेपदी निवड ग्राह्य धरली. त्यानंतर २० मे रोजी महापौर व मनपा आयुक्त यांनी या बदलाला मंजुरी दिली. मात्र, किशोर जिचकार यांनी १८ मे रोजीच वनवे यांच्या पाठिंब्याने नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्ज सादर केला होता. मनपातील संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्याला नामनिर्देशित सदस्याचे एकच पद आले आहे.