शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या हस्तक्षेपामुळे सामाजिक सलोख्याला धक्का

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय

तारिक अन्वर : सरकारची चुकीच्या दिशेने वाटचालनागपूर : देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप वाढल्याने देशातील सामाजिक सलोख्याला धक्का पोहचल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी शनिवारी केला. पत्रकार भवनात आयोजित वार्तालाप कार्यक्र मात ते बोलत होते.अटल बिहारी वाजपेयी भाजपचे पंतप्रधान होते परंतु त्यांनी वादग्रस्त मुद्यांना बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. हे देशासाठी घातक आहे,, असे मत अन्वर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मते मिळाली तर विरोधात ६९ टक्के मते पडली. असे असतानाही भाजपच्या २८८ जागा निवडून आल्या. मुस्लीम समाजाच्या लोकांनी भाजपला मते दिली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मतदान केले. काही दिवसातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. याचा परिणाम नुक त्याच पार पडलेल्या काही राज्यातील पोटनिवडणुकीत दिसून आला. लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष विचाराचे नेते एकत्र आल्याचे अन्वर म्हणाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, राजू नागूलवार, रमेश फुले, पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.मोदींचे विरोधीमुक्त धोरणसरकारइतकेच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाही. एकूण जागांच्या १० टक्के निवडून आल्या तरच विरोधी पक्षनेतेपद देता येईल, असे घटनेत कुठेही नमूद नाही. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सरकारला निर्देश दिलेले आहे. परंतु मोदींना विरोधीमुक्त, विरोधमुक्त सरकार चालवायचे असल्याचे अन्वर म्हणाले.(प्रतिनिधी)