शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो उभारणार पुण्याची मेट्रो

By admin | Updated: October 16, 2016 02:31 IST

राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे.

नागपुरात बनणार कोचेस : राज्य सरकार व चीनच्या कंपनीत सामंजस्य करारनागपूर : राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे मेट्रो रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे नागपुरात मेट्रो रेल्वे उभारण्याचे काम सुपर फास्ट गतीने सुरू असल्यामुळे पुण्यातील रेल्वे उभारण्याचे कामही नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वेसाठी नागपुरातच रोलिंग स्टॉक तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकार व चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन (सीआरआरसी) दरम्यान सामंजस्य करार झाला. याच वेळी कार्यस्वीकृती पत्र (एलओए) हस्तांतरण सोहळाही पार पडला. सामंजस्य करारावर राज्य सरकारतर्फे विकास आयुक्त (उद्योग) विजय सिंघल व सीआरआरसी तर्फे उपमहाव्यवस्थापक (ओव्हरसीज बिझनेस डिव्हिजन) झाऊ चुआनची यांनी तसेच एलओए वर एनएमआरसीएलतर्फे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग व सीआरआरसी तर्फे संचालक, (इंटरनॅशनल सिस्टीम एशिया अ‍ॅण्ड नॉर्थ अमेरिका डिपार्टमेंट) चेनचुंग टिंग यांनी स्वाक्षरी केली. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रधान सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात आजवर बऱ्याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, त्यासाठी लागणारा रोलिंग स्टॉक आयात करण्यात आला.