नागपूर : शेतकरी आंदोलनामुळे ४ डिसेंबरला कोरबावरून रवाना होणारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२३७ कोरबा-अमृतसर त्री साप्ताहिक पूजा स्पेशल रेल्वेगाडी अंबाला रेल्वेस्थानकावर समाप्त होऊन अंबालावरून बिलासपूरला रवाना होणार आहे. तसेच ६ डिसेंबरला अमृतसरवरून सुटणारी रेल्वेगाडी क्रमांक ०८२३८ अमृतसर-बिलासपूर त्री साप्ताहिक पूजा स्पेशल रेल्वेगाडी अमृतसरच्या ठिकाणी अंबाला रेल्वेस्थानकावरून रवाना होईल. ही गाडी अंबाला अमृतसर दरम्यान रद्द राहणार आहे.
.............