शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या शहरीकरणात सार्वजनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST

- मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. : प्रवासासाठी मेट्रोचा उपयोग करा नागपूर : वाढत्या शहरीकरणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असून ...

- मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. : प्रवासासाठी मेट्रोचा उपयोग करा

नागपूर : वाढत्या शहरीकरणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असून आरामदायक प्रवासासाठी नागरिकांनी मेट्रो रेल्वेचा उपयोग करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले. गुरुवारी महामेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशनदरम्यान त्यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी नागरिकांना उद्देशून ते बोलत होते.

अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर बुधवारपासून दोन नवीन मेट्रो स्टेशन शंकरनगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन नागरिकांच्या सेवेत सुरू झाले आहेत. तसेच ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू असून नागरिक याचा वापर करीत आहे. राधाकृष्णन म्हणाले, नागपुरात नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्यांना परवडणारे आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरण राखण्यासदेखील मदत होते.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका नियोजन करीत आहे. कोरोना कालावधीमध्ये कमीत कमी व्यक्तींशी संपर्क साधून नागपूर मेट्रोने सुरक्षित आणि चांगला प्रकारचा प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.