शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सायको आला रे...

By admin | Updated: February 6, 2017 01:56 IST

अजनीतील एका महिलेवर चाकूहल्ला करून तिला जखमी केल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.

महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न : अजनीत तणाव, शहरभर चर्चेला उधाण नागपूर : अजनीतील एका महिलेवर चाकूहल्ला करून तिला जखमी केल्याचे वृत्त शहरभर पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली. सोशल मीडियावरून घटनास्थळावरील तणावाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने ही चर्चा तिखट-मीठ लावून पसरविली जाऊ लागली. प्रत्यक्षात एका दुचाकी चालकाने पीडित महिलेचा हात मुरगाळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ चाकू होता की नाही, ते प्रत्यक्षदर्शींच्या बयानातून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी ‘तोच सायको’आहे की नाही, ते स्पष्ट नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महिनाभरात अनेक महिला-मुलींवर चाकूहल्ला करणाऱ्या सायकोने उपराजधानीत दहशत पसरविली आहे.अजनीच्या या घटनेने या दहशतीत भर घातली असून, आला रे आला... लांडगा आला...अशासारखी अफवा सर्वत्र पसरली आहे. घटनास्थळावरील माहितीनुसार, रेखा पवार (वय ३७) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती अजनीतील नालंदानगरात राहते. या भागातील अ‍ॅड. उईके आणि वैद्य यांच्याकडे ती धुणीभांड्याचे काम करते. नेहमीप्रमाणे ती रविवारी दुपारी आपले काम आटोपून १२.३० ते १२.४५ च्या सुमारास नालंदानगरातून जात असताना काळे कपडे घातलेला मोटरसायकलवरील एक तरुण तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिचा हात धरताच रेखाने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केली. घटनास्थळाच्या बाजूच्या घरी लग्नसमारंभ असल्याने तेथे मोठी गर्दी होती. त्यामुळे अनेक जण धावत आले. ते पाहून आरोपी पळून गेला. प्रारंभी ही घरगुती घटना असल्याचे सांगून काहींनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, काहींनी हा ‘सायकोच असावा’ असे सांगितल्याने घटनास्थळी गर्दी वाढू लागली. पाहता पाहता परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच अजनी पोलिसांचा ताफा, परिमंडळ ४ चे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी