शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांनी फुलवले केळीचे बन, भाज्यांचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे नागपूर : तसे बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. ...

सुमेध वाघमारे

नागपूर : तसे बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. हा अनुभव लक्षात घेऊन याच अनुभवावर मागील काही वर्षांपासून त्यांच्या परिश्रमावर जवळपास पाच एकरवर केळी व भाज्यांचा मळा फुलला आहे.

एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाले की, अखेरच्या श्वासापर्यंत त्याचे आयुष्य दगडी भिंतीच्याआड जाते, असे बोलले जाते. परंतु, नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र वेगळे आहे. मनोरुग्णालयातील विविध सामाजिक उपक्रमांतून मनोरुग्णांना समाजाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या रुग्णालयात पुरुष व महिला मिळून ४५०वर रुग्ण दाखल आहेत. यातील जवळपास ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. यातील काही बरे झालेले व शेतीकामाची आवड असणाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. मनोरुग्णालयातील सुमारे दोन एकरमध्ये भाजीपाला तर टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या उपक्रमातून तीन एकरमध्ये केळीची बाग लावण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत २९ हजार १७८ किलो विविध भाज्या व केळीचे उत्पादन घेतले आहे. सध्याच्या स्थितीत दोनवेळच्या जेवणासाठी लागणारी भाजी याच शेतीतून येत आहे. उरलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी पाठवून त्यातील मिळालेला पैसा रुग्णांच्या खात्यात जमा केला जात आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरला आहे.

११५ मनोरुग्णांच्या परिश्रमाला आले यश

प्रादेशिक मनोरुग्णालयाचा पुढाकार, टाटा ट्रस्टचे सहकार्य आणि मनोरुग्णांच्या परिश्रमामुळे २०१८ मध्ये २७ रुग्णांनी मिळून मेथी, पालक, मुळा, गोडबाजी, टोमॅटो आणि पपई असे एकूण १४६५ किलोचे उत्पादन घेतले. २०१९ मध्ये ५३ मनोरुग्णांच्या प्रयत्नांतून ७३६ किलो तर २०२० मध्ये ३५ मनोरुग्णांच्या कष्टावर २६ हजार ९७७ किलोच्या केळीचे उत्पादन घेतले. या तीन वर्षांत ११५ मनोरुग्णांच्या परिश्रमातून २९ हजार १७८ किलो केळी व भाज्यांचे उत्पादन काढण्यात यश मिळाले. या उपक्रमाला मनोरुग्णांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे रुग्णालय प्रशासनच नाही तर रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रुग्णांच्या खात्यात ६३ हजार रुपये

शेतीतून मिळालेल्या केळी व भाज्यांच्या उत्पादनातून खर्च वगळता जो नफा शिल्लक राहतो तो शेतीमध्ये काम करणाऱ्या मनोरुग्णांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत ६३ हजार ६० रुपये खात्यात जमा केले आहेत. बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांना या पैशांची मदत होत आहे.

शेतीच्या कामातून चार जणांचे पुनर्वसन

मनोरुग्ण असा शिक्का बसल्याने फार कमी नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घेऊन जातात. अनेकवेळा नातेवाईकांनी दिलेले घराचे पत्तेही खोटे ठरतात. अशावेळी रुग्णांना दिलेले पुनर्वसनाचे प्रशिक्षण उपयोगी येत आहे. नुकतेच बरे झालेल्या चार रुग्णांना रुग्णालयाबाहेर शेतीच्या कामातून स्वत:ला उभे केले आहे. हेच रुग्णालयाचे खरे यश आहे.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.