शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भाजी रस्त्यावर फेकणार्‍या पीएसआयची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना पोलीस आयुक्तालयातून आज 'शोकॉज नोटीस'ही बजावण्यात आली आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये उमटलेल्या वृत्तामुळे या घटनेचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. शहर पोलीस दलानेही त्यांच्या ट्विटरवर संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जगण्या-मरण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक गर्दी करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढतो. जरीपटक्यात मंगळवारी आठवडी बाजारात अशाच प्रकारे एका महिलेने रस्त्यावर भाजीचे दुकान लावले होते. तेथे ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. लोकमतने त्यासंबंधीचे वृत्त आज प्रकाशित केले. त्यामुळे चोहोबाजूने निषेधाचा सूर उमटला. ट्विटर, व्हाॅट्सॲपसह सोशल मीडियावर लोकमतच्या वृत्ताचे कात्रण आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या घटनेचा चोहोबाजूने निषेध नोंदविण्यात आला. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार खांडेकर यांना शो काज नोटीस बजावण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवरही या घटनेच्या संबंधाने खुलासा करण्यात आला. "ही घटना निंदनीय असून संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असल्याचे त्यात म्हटले आहे."

--

उपायुक्तांकडून चौकशी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून उपनिरीक्षक खांडेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.