शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 02:56 IST

आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील लोक भारतात उपचारासाठी येत आहेत.

नितीन गडकरी : ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चा समारोपनागपूर : आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील लोक भारतात उपचारासाठी येत आहेत. परंतु देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. हृदयरोगावरील उपचार फार महागडे आहेत. यामुळे स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. अर्नेजा हार्ट अ‍ॅण्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) व असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, विदर्भ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून दोन दिवसीय ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी याच्या समारोपीय प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जसपाल अर्नेजा, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबईचे प्रसिद्ध हृदयशल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा, जसलोक हास्पिटल मुंबईचे डॉ. अश्विन मेहता, फोर्टिस एस्कॉटर््स हार्ट इन्स्टिट्यूूट दिल्लीचे डॉ. अशोक सेठ, डॉ. जय देशमुख, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. नितीन तिवारी, डॉ. अशोक वासनकर, डॉ. भूपेंद्रसिंह अर्नेजा, डॉ. निखिल बालंखे व डॉ. इंदू अर्नेजा आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, जगात भारतातील डॉक्टर आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर्संनी आपले नाव कमावल्याने भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. अमेरिकेत १० मधून चार डॉक्टर भारतीय आहेत. आरोग्य क्षेत्रात नित्य नवे बदल होत आहेत, याची माहिती डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. ‘नागपूर लाईव’ सारख्या परिषदेतून डॉक्टरांना ‘अपडेट’ होण्याची संधी मिळते. अशा परिषदांमधून संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे कार्यही होणे गरजेचे आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. यासाठी मेडिकल कॉलेजची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यालाच घेऊन मुंबई येथे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपच्या (पीपीपी)आधारावर एक पंच तारांकित रुग्णालय तयार होत आहे. येथे ६० टक्के गरीब रुग्णांवर उपचार केले जातील. शासकीय इस्पितळांमधील आरोग्य सेवा सुधारण्याकडेही लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे, चॅरिटेबल ट्रस्ट व स्वयंसेवी संस्थाना आरोग्य क्षेत्राशी जोडण्यासाठी नियमांत बदल केले जात आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केले. संचालन डॉ. अंजली व डॉ. प्रशांत भांडारकर यांनी केले. आभार डॉ. मोहजीत अर्नेजा यांनी मानले. (प्रतिनिधी)हृदय रोगाच्या उपचारासाठी नागपूर ‘बेस्ट’ परिषदेत आलेल्या देशभरातील प्रसिद्ध चिकित्सकांनी हृदय रोगाच्या उपचारासाठी नागपूर उत्कृष्ट (बेस्ट) आहे, असे मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोक सेठ म्हणाले, नागपुरात माझ्या आईचे शिक्षण झाले. यामुळे या शहराशी माझे कौटुंबिक नाते आहे. कार्डिओलॉजीमध्ये या शहराने मोठी प्रगती केली आहे. येथे हृदयरोग विशेषज्ञांची संख्या सर्वात जास्त आहे, असेही ते म्हणाले. डॉ. रमाकांत पांडा म्हणाले, १९९३ मध्ये डॉ. अर्नेजा यांची भेट झाली. त्यावेळी नागपुरात फारच कमी कॅथलॅब व हृदयरोग विशेषज्ञाची संख्या होती. परंतु आज स्थिती बदलली आहे. हृदय विकारावरील उपचाराच्या संदर्भात नागपुरात हव्या त्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. ‘नागपूर लाईव्ह’ सारखी परिषद दोन-तीन वर्षातून एकदा तरी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ‘मेडिकल टुरिजम’साठी नागपूर योग्य गडकरी म्हणाले, पाश्चात्त्य देशातील लोकांमध्ये भारतात उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हैदराबाद यासाठीच प्रसिद्ध आहे. नागपूर देशाच्या मध्य ठिकाणी आहे. येथील वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. हैदराबादच्या धर्तीवर नागपूर वैद्यकीय पर्यटनासाठी (मेडिकल टूरिजम) योग्य असू शकते. यासाठी प्रयत्नांची गरज आहे.