शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १९ कोटींचा निधी द्या; लघुसिंचन विभागाचा प्रस्ताव

By गणेश हुड | Updated: June 22, 2024 17:55 IST

नाला खोलीकरणांची शेतकऱ्यांची मागणी 

नागपूर :  जि़ल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित ४७० तलाव आहेत.  अतिवृष्टी आणि पुरामुळे मागील काही वर्षात तलावांचे नुकसान झाले. नादुरुस्त तलावांची दुरुस्ती, लघुपाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे व  दुरुस्तीसाठी १८ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीची मागणी  लघुसिंचन विभागाने केली आहे.  त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे.

२०२२ मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास ११० तलाव नादुरुस्त झाले होते.१३७  तलावांना अतिवृष्टीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. १५ ऑगस्ट २०२२ लाउमरेड तालुक्यातील एक तलाव फुटला होता. तर, याच वर्षात १४ जुलैला कुही तालुक्यातील देवळी खुर्द येथील एक तलावही फुटला होता. २०२३ मध्ये  १३५ तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. यासाठी ७.६९ कोटींची मागणी केली होती. परंतु निधी अभावी तलावांची दुरुस्ती झाली नाही. 

नाला खोलीकरण कराअतिवृष्टी व पुरामुळे नाल्यात मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाल्यांना पूर आल्यास पुराचे पाणी लगतच्या शेतात शिरते. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान होते. याचा विचार करता जिल्ह्यात नाले खोलीकरण मोहीम राबविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. १९ कोटींच्या प्रस्तावात नाले खोलीकरणांच्या कामांचाही समावेश आहे.प्रस्तावात १८८ कामांचा समावेशलघुसिंचन विभागाच्या प्रस्तावात १८८ कामांचा समावेश आहे. यात लघुपाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन, लघुपाटबंधारे योजना व दुरुस्तीचे ३५ कामे, कोल्हापुरी बंधारे बांधकाम व दुरुस्ती, नाला खोलीकरण अशा १३२ कामांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. 

जिल्ह्यातील एकूण तलाव ४७०* लघु सिंचन-१३४* पाझर तलाव-६०* गाव तलाव-३९* मामा तलाव-२१४* साठवण तलाव-२४