शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तळागाळातील व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:21 IST

समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा प्रारंभपात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वाटपधान्य वाटप आणि धूरमुक्त महाराष्ट्रासाठी गॅस कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बचत भवन येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना गॅस जोडणी व रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला मदत देता येत असून, नव्याने लाभार्थी जोडता येत आहेत. समाजातील तळागळातील व्यक्ती, वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील लोकांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. याबरोबरच सर्वांसाठी घरे, आयुष्यमान भारत यासारख्या योजनांद्वारेही जनसामान्यांना दिलासा देण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे एक कुटुंब स्वावलंबी होण्यास हातभार लागतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड अथवा गॅस जोडणी नाही अशा पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरण, सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० टक्के धान्य वितरण तसेच सर्व कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) वितरित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.यांना मिळणार लाभ, असे करा निवेदनसर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरणाकरिता विहित नमुन्यातील अर्ज, कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी पुरावा म्हणून घर टॅक्स पावती, वीज बिल, मतदान कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच वार्षिक उत्पन्न शहरी भागात राहणाऱ्यांना ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागात राहणाऱ्यांना ४४ हजार रुपयाच्या आत असलेल्यांना प्राधान्य. या योजनेचा लाभ मिळेल. जुन्या शिधापत्रिकेवर वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयाच्यावर असल्यास उत्पन्न कमी असल्याचे कुटुंबप्रमुखाचे हमीपत्र. विधवा, दुर्धर आजारग्रस्त, अपंग असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) देण्याकरिता कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विहित नमुन्यातील केवायसी अर्ज आवश्यक आहे. केवायसी अर्ज स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत उपलब्ध आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय